Shiva-Karya-Sudhir-Mungantiwar-historic-initiative-important-decisions-inspiration : शिवकार्याची प्रेरणा सर्वदूर जागृत व्हावी या ध्येयाने घेतले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
Nagpur : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ नाव नाही, तर एक अदम्य विचार, स्वाभिमानाचे स्फुरण आणि नीतिमत्तेचा सर्वोच्च आदर्श आहे. ज्यांच्या नावाच्या उच्चारानेच मनगटात हत्तीचे बळ संचारते आणि मस्तक आदराने झुकते, अशा युगपुरुषाच्या चरणी मानाचा मुजरा अर्पण करण्याचा हा पावन क्षण आहे. ज्याप्रमाणे जिजाऊंच्या संस्कारांनी शिवबा घडले, त्याच निष्ठेने शिवरायांचा वारसा नव्या पिढीच्या रक्तांत भिनवण्यासाठी राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवकार्याचा जो जागर मांडला आहे, तो खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरतो. मुनगंटीवारांची ही सेवा म्हणजे शिवरायांच्या चरणी वाहिलेली भक्तीपुष्पच आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.*
सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव व्यापक स्तरावर व्हावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनीच पुढाकार घेऊन पूर्णत्वास नेला. आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करून शिवचरित्राचा गौरव ऐतिहासिक स्थळी पोहोचविण्याचा अनोखा उपक्रमही त्यांनी राबवला. प्रतापगडावरील भवानी मातेला चांदीचे छत्र अर्पण करून त्यांनी श्रद्धा आणि इतिहासाचा सुंदर संगम घडवून आणला.
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला नवे वैभव प्राप्त व्हावे, यासाठी देशभरातील पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. या जलाने जलाभिषेक करून ऐतिहासिक परंपरेला आधुनिक काळात साजेशी उंची देण्यात आली. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या शिवप्रभूंच्या शौर्याची गाथा म्हणजे सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमणारा सिंहाचा डरकाळीसारखा आवाज आहे. त्यांच्या तलवारीच्या एका धारेने जुलमी सत्तेचा अंत झाला आणि रयतेच्या आयुष्यात स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. या रयतेच्या राजाच्या शिवराज्याभिषेक मिरवणुकीसाठी चांदीची पालखी भेट देणे असो वा गेटवे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करणे असो मुनगंटीवारांनी प्रत्येक उपक्रमातून दैदिप्यमान इतिहासाला मानाचा मुजरा केला. एवढेच नव्हे तर राज्याभिषेक वर्षाचा विशेष लोगो प्रसारित करून शासनाच्या कामकाजात त्याचा वापर सुरू करण्याचा उपक्रमही त्यांच्या पुढाकारातूनच साकारला.
शिवचरित्र जनमानसात रुजावे, यासाठी त्यांनी विविध सांस्कृतिक माध्यमांचा प्रभावी वापर केला. शिवकालीन ‘होन’ या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, शहाजीराजे व मासाहेब जिजाऊ यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटे प्रकाशित करणे, मंत्रालयात दररोज ‘शिवविचार’ प्रसारण सुरू करणे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग राज्यभर सुरू करणे हे उपक्रम त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक ठरले. शिवकालीन चलनावर जनजागृती शिबिरे, कॉफी टेबल बुकची निर्मिती आणि देशाच्या सीमारेषेवरील कुपवाडा येथे भारतीय सेनेच्या तळावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा प्रेरणादायी उपक्रमही त्यांच्या पुढाकारातून साकार झाला.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिला चंद्रपूरच्या विकासाचा ‘फाइव्ह इयर प्लॅन’!
इतिहासातील अमूल्य वारसा पुन्हा भारतात यावा, या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे लंडनमधून भारतात आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आणि नंतर ती वाघनखे भारतात आणली. ज्या वाघनखांनी स्वराज्यावर चालून आलेल्या संकटाचा कोथळा बाहेर काढला, ती शौर्याची निशाणी पुन्हा मायदेशात आणण्याचे महाकठीण कार्य मुनगंटीवारांनी सिद्धीस नेले, ही प्रत्येक शिवभक्तासाठी सर्वात मोठी स्वाभिमानाची बाब आहे. शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडून या ऐतिहासिक वारशाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली.
गरिबांना न्याय मिळावा, रयतेचे राज्य निर्माण व्हावे, या ध्येयासाठी आयुष्य वेचणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. शिवरायांच्या विचारांमधून संघर्षाची शक्ती, स्वाभिमानाची जाणीव आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते. म्हणूनच शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या विचारांचे स्मरण करून न्याय्य, सक्षम आणि लोककल्याणकारी समाजरचना उभी करण्याचा संकल्प प्रत्येकाने कराव…








