Ashok kharat case : “रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा”५८ व्हिडिओंनी वाढली खळबळ !

sambhajiraje-chhatrapati-demand-resignation-rupali-chakankar-ashok-kharat-case-58-videos : कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती संतप्त

Nashik : तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाला आता तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रकरणावर भाष्य करत महाराष्ट्राच्या परंपरेचा उल्लेख केला आणि अशा प्रकारच्या घटना घडणे निंदनीय असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे असे प्रकार गंभीर आहेत. जर महिला आयोगाच्या प्रमुखांचा संबंधित ट्रस्टशी संबंध असेल, तर त्यांनी नैतिकदृष्ट्या तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली.

Bombay high court : प्रशासक सरपंच ‘नामधारीच’ राहणार; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा झटका

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि अशोक खरातच्या संपर्कात कोण-कोण होते, याचाही तपास व्हावा, अशी मागणी करत त्यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप करत खळबळ उडवली आहे. त्यांनी दावा केला की, पोलिसांनी जप्त केलेल्या ५८ व्हिडिओंमधून अनेक महिलांवर अत्याचार झाल्याची शक्यता व्यक्त होते. तसेच, रूपाली चाकणकर या पदावर राहिल्यास पुरावे नष्ट होण्याची भीती असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sindkhedraja development : कमालच आहे! सिंदखेडराजा विकास आराखड्याची फाईलच गायब

पत्रकार परिषदेत बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले की, हा विषय कोणत्याही पक्षाचा नसून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. संबंधित ट्रस्टवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी इशारा दिला की, चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल.

दरम्यान, अशोक खरात याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुंगीचे औषध देऊन ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून एक पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला असून त्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे.

fake voters : धाडमध्ये ‘बोगस मतदार’ प्रकरणाने खळबळ; भाजप-प्रहारचा बहिष्काराचा इशारा

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टशी संबंधित असून, मर्चंट नेव्हीत सेवा केल्यानंतर तो ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्याच्या संपर्कात अनेक प्रभावशाली व्यक्ती असल्याची माहिती समोर येत असून, या संपूर्ण प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.

या घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गडद होत असून, राजकीय दबाव, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि भोंदूबाबांच्या वाढत्या प्रभावावरून राज्यातील वातावरण तापले आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

__