व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar: जिथे गरज, तिथे त्वरित कृती! मुनगंटीवारांनी दोन तासांत चंद्रपूर येथील...

Sudhir Mungatiwar: जिथे गरज, तिथे त्वरित कृती! मुनगंटीवारांनी दोन तासांत चंद्रपूर येथील ऑटोचालकांना दिला थंड दिलासा

Immediate response to auto drivers’ demand; MLA Sudhir Mungantiwar distributed cool jars within just two hours. : चंद्रपूर येथील ऑटोचालकांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद; आ. सुधीर मुनगंटीवारांनी यांच्या हस्ते ‘कुल जार’ वाटप

Chandrapur : चंद्रपूरच्या कडक उन्हात प्रवाशांची सेवा करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ऑटोचालकांच्या अडचणीची जाणीव ठेवत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील नेतृत्वाचे दर्शन घडवले. आज चंद्रपूर रेल्वे स्टेशनला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी प्रवाशांच्या सुविधा व सुरक्षिततेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचवेळी स्टेशनसमोरील ऑटोचालकांनी उन्हाच्या तडाख्यात थंड पिण्याच्या पाण्याची गरज व्यक्त करत ‘कूल जार’ची मागणी केली.

ऑटोचालकांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी अवघ्या दोन तासांत ‘कूल जार’ उपलब्ध करून दिले आणि स्वतःच्या हस्ते त्यांचे वाटप केले. त्यांच्या या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे ऑटोचालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चंद्रपूर शहरातील ऑटोचालकांनीही याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसचे ‘पाप’ जनता उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही; बावनकुळेंचा नागपुरातून एल्गार

उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये दिवसभर रस्त्यावर काम करणाऱ्या ऑटोचालकांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरला. अचानक मिळालेल्या या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद पाहून उपस्थित सर्वांनाच समाधानाची भावना झाली. “आमच्या अडचणी समजून घेणारा आणि लगेच मदतीला धावून येणारा नेता आमच्यासोबत आहे,” अशा शब्दांत ऑटोचालकांनी आपल्या भावना व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांचे मनापासून आभार मानले.

Amruta fadnavis : अमृता फडणवीसांचे विधान चर्चेत; टीसीएस प्रकरणावरून व्यक्त केली चिंता

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांच्या गरजा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. उन्हाळ्यात पाण्याची गरज ही अत्यंत मूलभूत आहे आणि त्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.” त्यांच्या या संवेदनशील आणि तत्पर निर्णयामुळे पुन्हा एकदा जनतेशी असलेले त्यांचे नाते अधिक दृढ झाले आहे.या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या छोट्याशा पण मनाला भिडणाऱ्या उपक्रमातून आ. मुनगंटीवार यांनी “सेवा हीच खरी राजकारणाची ओळख” असल्याचा संदेश दिला.

error: Content is protected !!