maharashtra-ips-transfer-list-major-police-administration-changes-2026 : नऊ जिल्ह्यांत पोलीस प्रशासनात व्यापक फेरबदल
Mumbai: महाराष्ट्र राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करत शासनाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे सातारा, सांगली, गडचिरोली, कोल्हापूर, जळगाव, धुळे, वाशीम यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आल्या असून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशानुसार तुषार दोशी यांची सातारा येथील पोलीस अधीक्षक पदावरून सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे येथील पोलीस उपआयुक्त पदावर कार्यरत असलेले निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली येथे कार्यरत असलेले संदीप घुगे यांना मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्त (सुरक्षा) म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
Employees strike : महाराष्ट्रात १७ लाख शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू
तुषार दोशी हे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान चर्चेत आले होते. त्यावेळी राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. आता त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून प्रशासनात नव्याने समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कोल्हापूर आणि गडचिरोली या संवेदनशील जिल्ह्यांमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. योगेश गुप्ता यांना कोल्हापूरवरून गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर निलोत्पल यांची गडचिरोलीवरून कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच एम. रमेश यांना पदोन्नती देत गडचिरोली येथेच पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Shyam Manav : फडणवीस सरकारनेच बुवा-बाबांचे प्रस्थ वाढवले, खरात प्रकरणावरून श्याम मानव यांचा आरोप
गुन्हे अन्वेषण विभागातही काही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महेश्वर रेड्डी यांची जळगाववरून पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. धुळे येथे कार्यरत असलेले श्रीकांत धिवरे यांची जळगाव येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजकुमार शिंदे यांना पुणे येथून वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे.
शासनाने या बदल्यांसंदर्भात पोलीस महासंचालकांना आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने हा आदेश जारी करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यापक बदलांमुळे संबंधित जिल्ह्यांमधील पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
__








