Allegation That Solid Waste Management in Malkapur Has Completely Collapsed : २७ एप्रिलपर्यंत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा, यंत्रणा कोलमडल्याचा आरोप
Malkapur शहरातील घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप करत शिवसेनेने नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात नियमित साफसफाई व कचरा संकलन तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी संजय केदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच २७ एप्रिलपर्यंत योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. कचरा गोळा करणाऱ्या गाड्या चार-चार दिवस येत नसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. याशिवाय ओला व सुका कचरा एकत्रच संकलित केला जात असल्याने व्यवस्थापनाचा पूर्ण बोजवारा उडाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
OBC federation : गॅस कनेक्शनवरून ‘क्रेडिट’ची लढाई; खामगावात भाऊ विरुद्ध सत्ताधारी आमनेसामने
नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने घाण उघड्यावर साचत असून, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शहरात साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. विशेषतः महिला व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचेही शिवसेनेने अधोरेखित केले आहे.
शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले यांनी सांगितले की, “घनकचरा व्यवस्थापनाचे काम पूर्णपणे कोलमडले आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कचरा संकलन गाड्या नियमित कराव्यात, ओला व सुका कचरा वेगळा गोळा करावा आणि नाल्यांची तळापासून साफसफाई करावी.” तसेच मुख्य रस्त्यांची नियमित झाडलोट करण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवसेना नेते गजानन मिरगे, शहर उपप्रमुख सतीश नवले, उमेश हिरुळकर, शंकर वाघ, उमेश वैष्णव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








