व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Railway over bridge : अखेर त्या उड्डाणपुलाच्या कामाला सुधारित मान्यतेचे ‘पिलर’!

Railway over bridge : अखेर त्या उड्डाणपुलाच्या कामाला सुधारित मान्यतेचे ‘पिलर’!

Cost of the New Tapadia Nagar Flyover Project in Akola rises to ₹104.79 crore : न्यू तापडिया नगर उड्डाणपूल प्रकल्पाचा खर्च १०४.७९ कोटींवर

Akola अकोला ते खरप बु. मार्गावरील सातव चौक ते न्यू तापडिया नगर दरम्यान रेल्वे उड्डाणपूल व पोहोचमार्ग बांधकाम प्रकल्पाला अखेर सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २१ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले.

या प्रकल्पाला यापूर्वी ९ मार्च २०१६ रोजी सुमारे ५० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष कामादरम्यान मध्य रेल्वे आणि दक्षिण-पूर्व रेल्वे मार्गावरील बदललेली रचना, वाढलेली व्याप्ती आणि खर्चवाढ लक्षात घेता सुधारित मान्यता आवश्यक ठरली.

Chief minister medical relief fund (CMMRF) : मुख्यमंत्री वैद्यकीय निधीमुळे ४.३६ कोटींचा ‘रिलीफ’; अकोल्यात ५३६ रुग्णांना मदत

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (अमरावती) यांनी सादर केलेल्या सुधारित अंदाजपत्रकानुसार प्रकल्पाचा खर्च आता १०४.७९ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. यात स्थापत्य कामे, आकस्मिक निधी, काम शुल्क, विमा, रेल्वे विभागाचा खर्च तसेच जीएसटीतील वाढ यांचा समावेश आहे. खर्चात झालेल्या मोठ्या वाढीमुळे प्रस्तावाला उच्च अधिकार समितीची मंजुरी घेण्यात आली होती. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाने अखेर सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Women’s reservation Bill: महिला आरक्षणावरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली; अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून नागपुरात शाब्दिक युद्ध

दरम्यान, या प्रकल्पाबाबत निधी किंवा मान्यता नसल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे हा संभ्रम दूर झाला आहे. या मान्यतेसाठी स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!