व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Vanchit bahujan aghadi : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीतर्फे सामूहिक...

Vanchit bahujan aghadi : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीतर्फे सामूहिक वाचन

Collective reading of the book Shivaji Kon Hota? organised by Vanchit Bahujan Aghadi : अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना

Akola वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यभर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून अकोल्यातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर, जुने बसस्थानक परिसरात सामूहिक वाचनाचा कार्यक्रम पार पडला. पक्षप्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भातील सूचना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्याने झाली. त्यानंतर विविध पदाधिकाऱ्यांनी पुस्तकातील मुद्दे वाचून संपूर्ण पुस्तकाचे सामूहिकरीत्या वाचन केले.

Vidhan parishad election : साडेचार वर्षांनंतर विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष इंजि. धीरज इंगळे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हा महासचिव संगीता आढाव, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष निलेश देव, महानगर महासचिव गजानन गवई, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Vidhan parishad election : नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावांना शिवसेनेतूनच जोरदार विरोध !

तसेच प्रभाताई शिरसाट, विकास सदांशिव, नगरसेवक शेख शमशू, पराग गवई, जयश्री बहादुरकर, उज्वला पातोडे, सुनील इन्नाणी, किशोर जामनिक, गोरसिंग राठोड, सचिन शिराळे, रामकुमार गव्हाणकर, चंद्रशेखर चिंचोळकार, बबलू शिरसाट, किशोर तेलगोटे, नितेश किर्तक, संतोष किर्तक, नितीन सपकाळ, शिलवंत शिरसाट, प्रविण पातोडे, उत्तमराव खंडारे, सुशील मोहाड, अतुल घरडे, योगिता शेळके, शेखर मेश्राम, शुद्धोधन इंगळे, अशोक मेश्राम आदींसह वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत महासभा आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!