व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Dhirendra Shastri controversy : भागवत, गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत हिंमत कशी झाली

Dhirendra Shastri controversy : भागवत, गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत हिंमत कशी झाली

congress attack on BJP indirectly on dhirendra shastri statement : धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने डिवचले, अमरावतीत आंदोलन

Amravati छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांच्याविरोधात अमरावती शहर काँग्रेसने रविवारी राजकमल चौकात तीव्र आंदोलन केले. या वेळी घोषणाबाजी करत शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्रात कायमस्वरूपी प्रवेशबंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य अपमानास्पद असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आंदोलन छेडण्यात आले.

Vanchit bahujan aghadi : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीतर्फे सामूहिक वाचन

दरम्यान, संबंधित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मोहन भागवत उपस्थित असतानाही या वक्तव्याला विरोध झाला नाही, असा आरोप करत काँग्रेसने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातही निषेध नोंदवला.

आंदोलनादरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘बागेश्वरला महाराष्ट्रात बंदी घाला’ अशा घोषणांनी राजकमल चौक परिसर दणाणून गेला. शास्त्री यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून राज्यात प्रवेशबंदी घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Vidhan parishad election : साडेचार वर्षांनंतर विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी

या आंदोलनात माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय, इंटक तसेच विविध विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!