व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र legeslative election : पश्चिम विदर्भातील नेत्यांचे विधान परिषद निवडणुकीकडे लक्ष; दोघांमध्ये चुरस,...

legeslative election : पश्चिम विदर्भातील नेत्यांचे विधान परिषद निवडणुकीकडे लक्ष; दोघांमध्ये चुरस, तिसरा पुन्हा संधीच्या शोधात

Leaders from West Vidarbha turn their focus to the Legislative Council election; a close contest between two contenders : प्रमुख नेते सक्रीय, पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा; १३ मे रोजी कार्यकाळ संपणार

Akola पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतून विधान परिषदेसाठी नियुक्तीकरिता इच्छुक नेत्यांमध्ये चुरस वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर काही प्रमुख नेते सक्रिय झाले असून, पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरू आहे.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून विधान परिषदेत संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. यासाठी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Dhirendra Shastri controversy : भागवत, गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत हिंमत कशी झाली

दरम्यान, शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक रामेश्वर पवळ यांनीही विधान परिषदेसाठी आपली दावेदारी पुढे केली आहे. त्यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडल्याचे वृत्त आहे. काही वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या इच्छेबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून आमदार अमोल मिटकरी पुन्हा एकदा विधान परिषदेत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचा विद्यमान कार्यकाळ १३ मे रोजी संपत असून, पुन्हा संधी मिळावी यासाठी ते पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. एकूणच, पश्चिम विदर्भातील अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने येत्या काळात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!