व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Chandrapur Congress : चंद्रपुरात काँग्रेस नेत्याचा जिल्हा परिषदेच्या जागेवर डल्ला; भाजपच्या तक्रारीनंतर...

Chandrapur Congress : चंद्रपुरात काँग्रेस नेत्याचा जिल्हा परिषदेच्या जागेवर डल्ला; भाजपच्या तक्रारीनंतर प्रशासनाने चालवला बुलडोजर

Congress leader accused of encroaching on a Zilla Parishad plot in Chandrapur; after a complaint by BJP, authorities carry out a bulldozer action : मूल शहरात गांधी चौक परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोक्याच्या जागेवर अवैध बांधकाम

Chandrapur जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आणि सार्वजनिक हितासाठी असलेल्या जागेवर राजकीय वरदहस्ताने कब्जा करण्याचा प्रयत्न चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मूल शहरातील गांधी चौक परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोक्याच्या जागेवर काँग्रेस नेते संतोष रावत यांनी केलेले अवैध बांधकाम जिल्हा परिषद प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने सार्वजनिक मालमत्तेवर होणारा हा अतिक्रमणचा प्रयत्न प्रशासनाने यशस्वीपणे हाणून पाडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूल येथील गांधी चौकात जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा असून ती प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राखीव आहे. मात्र, या जागेवर संतोष रावत यांनी बेकायदेशीररीत्या बांधकाम सुरू केल्याचा प्रकार समोर आला. सार्वजनिक मालमत्तेवर राजकीय दबावाच्या जोरावर ताबा मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा शहरात सुरू झाली होती. ही बाब लक्षात येताच भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले आणि नगरसेविका प्राची आक्केवार यांनी आक्रमक भूमिका घेत या अवैध बांधकामाची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे (CEO) लेखी स्वरूपात दाखल केली.

Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणतात, ‘अर्ज भरायला वेळ लागत नाही, कागदपत्रे घेऊनच फिरतो’

या तक्रारीची प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषद प्रशासनाने संतोष रावत यांना रीतसर नोटीस बजावून हे बांधकाम त्वरित थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासकीय आदेशालाही केराची टोपली दाखवत बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. अखेर प्रशासनाने कडक पवित्रा घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आणि जेसीबीच्या साहाय्याने हे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे पाडून टाकले.

राजकीय प्रभावाचा वापर करून सार्वजनिक जागा बळकावणाऱ्यांना या कारवाईने मोठा दणका दिला आहे. सार्वजनिक हिताच्या जागांवर कोणाचाही बेकायदेशीर कब्जा खपवून घेतला जाणार नाही, असा कडक संदेश या निमित्ताने प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, वेळीच हस्तक्षेप करून हा घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल भाजप शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले आणि नगरसेविका प्राची आक्केवार यांचे कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!