व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Supriya sule : मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक

Supriya sule : मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक

mp-supriya-sule-car-accident-on-mumbai-pune-expressway-all-safe : ‘सर्वजण सुखरूप’, निष्काळजी वाहनचालकांवर संताप

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने काही काळ महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात सुप्रिया सुळे यांच्यासह गाडीत प्रवास करणारे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना हा अपघात घडला. महामार्गावर वेगात येणाऱ्या गुजरात क्रमांकाच्या वाहनाने त्यांच्या गाडीला बाजूने जोरदार धडक दिली. धडकेमुळे वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असले तरी मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अपघातानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेची माहिती देताना रस्ते सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. अतिवेग आणि निष्काळजी वाहनचालना ही महामार्गांवरील अपघातांची मोठी कारणे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच प्रत्येकाने सीट बेल्टचा वापर करावा, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Sudhir Mungatiwar: मुल रेल्वे मालधक्का प्रकल्पाला अखेर ब्रेक ! आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या ‘पॉवरफुल’ पाठपुराव्याला मोठे यश

मुंबई-पुणे महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा आणि धोकादायक मार्ग मानला जातो. दरवर्षी या महामार्गावर वेगमर्यादा न पाळणे, निष्काळजी ओव्हरटेक आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यामुळे शेकडो अपघात घडतात. अनेक अपघातांमध्ये मोठी जीवितहानीही झाल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा महामार्ग सुरक्षा आणि वाहतूक शिस्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Chandrashekhar bawankule on Vijay Wadettiwar: वडेट्टीवारांना माहितीचा अभाव, ती जमीन सरकारचीच; ‘मिरासार’ प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार

दरम्यान, अकोला-पातूर रोडवरही मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही युवक दिल्ली दरबार हॉटेलमधून जेवण करून अकोल्याकडे परतत असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जखमी युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.

error: Content is protected !!