petrol-diesel-price-hike-fourth-time-in-10-days-maharashtra-mumbai-latest-rates-2026 : देशात पेट्रोल-डिझेलचे दर दहा दिवसात चौथ्यांदा भडकले
Mumbai : देशभरात वाढत्या महागाईमुळे नागरिक आधीच आर्थिक तणावात असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा परिणाम थेट वाहतूक, किराणा, भाजीपाला आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ताज्या दरवाढीनुसार पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचला असून डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर झाले आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 111 रुपयांच्या पुढे गेले असून डिझेलही 98 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
Mlc Election : नवा फॉर्म्युला, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला फक्त 1 जागा?
गेल्या 10 दिवसांत पेट्रोल-डिझेल दरवाढीची ही चौथी वेळ आहे. 15 मे रोजी प्रथम मोठी दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर 19 मे आणि 23 मे रोजीही इंधनाच्या दरात वाढ झाली. आता 25 मे रोजी पुन्हा एकदा दर वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या चार वाढींमुळे पेट्रोल प्रति लिटर तब्बल 7.35 रुपयांनी तर डिझेल 7.53 रुपयांनी महाग झाले आहे.
मुंबईमध्ये पेट्रोलचा नवीन दर 111.12 रुपये प्रति लिटर झाला असून यापूर्वी तो 108.39 रुपये होता. डिझेलचा दर 97.68 रुपये प्रति लिटरवर पोहोचला असून यापूर्वी तो 94.97 रुपये होता. मुंबईत पेट्रोलमध्ये 2.73 रुपयांची तर डिझेलमध्ये 2.81 रुपयांची वाढ झाली आहे.
नागपुरात पेट्रोलचा दर 111.70 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेल 98.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. सोलापुरात पेट्रोल 111.87 रुपये तर डिझेल 98.55 रुपये प्रति लिटर झाले आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर 111.77 रुपये तर डिझेल 98.46 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.
MLA fund : आमदार निधीची विकासगती मंदावली; ९५२ कामे रखडली, नव्या ४६० मंजुरींवरही प्रश्नचिन्ह
भंडाऱ्यात पेट्रोल 112.32 रुपये प्रति लिटरवर पोहोचले असून डिझेल 98.99 रुपये झाले आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 112.47 रुपये तर डिझेल 99.11 रुपये प्रति लिटर झाला आहे. वाशीममध्ये पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 98.17 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
रायगडमध्ये पेट्रोल 112.08 रुपये तर डिझेल 98.70 रुपये प्रति लिटर झाले आहे. हिंगोलीमध्ये पेट्रोलचा दर 113.02 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेल 99.67 रुपये झाले आहे. सांगलीत पेट्रोल 111.69 रुपये तर डिझेल 98.40 रुपये प्रति लिटर झाले आहे.
गोंदियामध्ये पेट्रोलचा नवीन दर 113.17 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेल 99.83 रुपये झाले आहे. अमरावतीत पेट्रोल 112.78 रुपये तर डिझेल 98.43 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बुलढाण्यात पेट्रोलचा दर 112.49 रुपये असून डिझेल 99.16 रुपये प्रति लिटर झाले आहे.
Fuel crisis : शेतकरी इंधनासाठी रांगेत; शासनाने ‘हवेतील’ विधाने सोडून वास्तव पाहावे!
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक स्तरावरील इंधन मागणी वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. युरोप आणि इतर देशांमध्येही इंधन दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. लंडनमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 190 रुपयांच्या पुढे गेले आहेत. युरोपियन युनियनमध्येही इंधन दर 179 रुपयांच्या वर पोहोचले आहेत. हाँगकाँगमध्ये जगातील सर्वात महाग पेट्रोल विकले जात असून ते जवळपास 300 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
भारतातील सलग वाढणाऱ्या इंधन दरांमुळे आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून सर्वसामान्य नागरिकांचे मासिक बजेट पुन्हा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
__








