व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar : कोळसाखाणीग्रस्त हजारो शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मुनगंटीवारांचा पाठपुरावा यशस्वी; शासन निर्णयाची...

Sudhir Mungatiwar : कोळसाखाणीग्रस्त हजारो शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मुनगंटीवारांचा पाठपुरावा यशस्वी; शासन निर्णयाची प्रक्रिया वेगात

Mungantiwar’s relentless follow-up for justice to thousands of coal mine-affected farmers proves successful; process for issuing Government Resolution gathers pace : अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यपद्धती ठरणार; शासन निर्णयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

Chandrapur: कोळसाखाणीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. त्यांच्या मागणीनुसार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीची महत्त्वपूर्ण बैठक १९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे होणार असून, या बैठकीत कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.

जिल्ह्यातील कोळसा उत्खनन व संबंधित औद्योगिक उपक्रमांमुळे शेतजमिनी, पिके आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि नुकसानभरपाईची प्रभावी यंत्रणा उभी राहावी, यासाठी मुनगंटीवार यांनी शासन दरबारी सातत्याने आवाज उठविला. महाराष्ट्र विधानसभेतही त्यांनी हा प्रश्न वारंवार उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते.

Abhijeet dipke : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी २० जूनला दिल्लीत आंदोलन

आता १९ जून रोजी होणाऱ्या बैठकीत कोळसाखाणीग्रस्त भागातील वास्तव परिस्थिती, शेतकऱ्यांच्या तक्रारी, नुकसानाचे स्वरूप आणि भरपाईसाठी आवश्यक निकष यावर सखोल चर्चा होणार आहे. बैठकीतील निर्णयांच्या आधारे नुकसानभरपाईसंदर्भातील शासन निर्णयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या अपेक्षा या बैठकीकडे लागल्या आहेत.

Sharad pawar : मोदी-नेहरू तुलना अशक्य; स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विसरता येणार नाही

दरम्यान, कोळसाखाणीमुळे बाधित शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी आपल्या सूचना, तक्रारी व मागण्या स्वीय सहायक संजय राईंचवार यांच्या ९५५२७९९६०८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना बैठकीत अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासमोर मांडून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!