व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chainsukh Sancheti : आमदारांची शेरोशायरी… लोक म्हणाले पहिले मतदारसंघातील समस्या बघा!

Chainsukh Sancheti : आमदारांची शेरोशायरी… लोक म्हणाले पहिले मतदारसंघातील समस्या बघा!

MLA Chaninsukh Sancheti’s poetic verses draw reactions; people say, first address the problems in your constituency : शेरोशायरीवर टाळ्या, कमेंटमध्ये जनतेची नाराजी; सोशल मीडियावर रंगली चर्चा

Malkapur मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्या शेरोशायरीची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असते. सभागृह असो किंवा पक्षीय बैठक, आपल्या खास शैलीतील शेरोशायरीमुळे ते अनेकदा लक्ष वेधून घेतात. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या आचरण समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीतही त्यांच्या शेरोशायरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

‘हर शख्स को ये वाजीब है… के सबसे पहले वो इन्सान बने’… या त्यांच्या शेरला समर्थकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी सोशल मीडियावर आमदारांच्या शैलीचे कौतुक करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र सोशल मीडियाच्या व्यासपीठावर केवळ कौतुकच होत नाही, तर जनतेच्या भावना आणि अपेक्षाही व्यक्त होत असतात. त्यामुळे या व्हिडिओखाली आलेल्या काही प्रतिक्रियांमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Women farmer status : राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी’ दर्जा !

काही नेटकऱ्यांनी शेरोशायरीचे कौतुक करण्याऐवजी मलकापूर मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठ्याच्या अडचणी, स्थानिक विकासकामांचा वेग आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत अनेकांनी थेट प्रश्न उपस्थित केल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधींनी काव्य आणि भाषणांपेक्षा विकासकामांवर अधिक भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांची संख्या लक्षणीय असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, व्हिडिओतील शेरोशायरीपेक्षा त्यावरील कमेंट्सच अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. “वाहवा मिळविणे सोपे, पण जनतेचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे,” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया राजकीय चर्चांना नवे वळण देत आहेत.

sarpanches-turned-contractors : कंत्राटदार झालो, अन् अडचणीत आलो!; बिलांसाठी सरपंचांची पंचायत धावपळ

यामुळे आमदारांच्या शेराने अधिक छाप पाडली की नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी, याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली असून सोशल मीडियावरील हा विषय अनेकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

error: Content is protected !!