व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election : हर्षजीत देशमुख आमच्यासाठी संपलेला विषय, वंचित सोबत जाण्याची भूमिका...

Legislative election : हर्षजीत देशमुख आमच्यासाठी संपलेला विषय, वंचित सोबत जाण्याची भूमिका स्पष्ट नाही

Harshjit Deshmukh is a closed chapter for us; there is no clear stand on aligning with Vanchit, Congress clarifies : विधान परिषद निवडणुकीतील अमरावतीच्या उमेदवारबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितले

Amravati अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. मंगळवारी रात्री अमरावतीतील नगरपरिषद, नगरपंचायत आणि काँग्रेसच्या विविध गटांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्याबाबत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली.

“काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हा विषय आमच्यासाठी आता संपला आहे. त्यांच्या उमेदवारीला आम्ही गांभीर्याने घेत नाही,” असे वक्तव्य डॉ. देशमुख यांनी केले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुरुवार, १८ जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Eknath Shinde Shivsena : अकोला जिल्ह्यात शिवसेनेचे नवे शिलेदार; जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुखांची नियुक्ती

बैठकीनंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील विविध गटांच्या नेत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. बैठकीतील चर्चेचा सविस्तर अहवाल आणि स्थानिक नेत्यांची भूमिका पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत काँग्रेसची अधिकृत भूमिका आणि अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, बुधवारी सकाळी ११ वाजता अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे.

Loan Waiver : तरुण शेतकऱ्याने स्वतःचीच दुचाकी पेटवली, सरकारवर संताप

या बैठकीला खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोट यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या पातळीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसल्याचे डॉ. सुनील देशमुख आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची अंतिम भूमिका काय राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!