New Shivsena District Chief and City Chief appointed in Akola district : विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप; संघटन विस्तारासाठी नवे पाऊल
Akola शिवसेनेच्या (शिंदे गट) अकोला जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीला गती देत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या वाटप करत माजी आमदार नारायण गव्हाणनकर, माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि मंगेश काळे यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर अकोला महानगर प्रभारी महानगरप्रमुखपदी राजेश मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रांनुसार, माजी आमदार नारायण गव्हाणनकर यांची बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Loan Waiver : तरुण शेतकऱ्याने स्वतःचीच दुचाकी पेटवली, सरकारवर संताप
चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्याकडे अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मंगेश काळे यांची अकोट विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्याकडे अकोला महानगर प्रभारी महानगरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच महिला सेना जिल्हाप्रमुखपदी नगरसेविका उषा विरक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने अकोला जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.








