व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Sudhir mungantiwar : मोरवा येथील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मुनगंटीवार आक्रमक

Sudhir mungantiwar : मोरवा येथील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मुनगंटीवार आक्रमक

Sudhir Mungantiwar takes an aggressive stand over the alleged assault case involving a minor girl in Morwa : पीडित बालिकेला तातडीने वैद्यकीय उपचार, मानसोपचार व समुपदेशनाची मागणी

Chandrapur चंद्रपूर शहरालगतच्या मोरवा गावातील वसाहतीत २८ जून २०२६ रोजी अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पडोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा जलद, निष्पक्ष व प्रभावी तपास करून दोषीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल, यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

मुनगंटीवार यांनी वाढत्या बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे सभागृहात नमूद केले. पीडित बालिकेला तातडीने तज्ज्ञांकडून वैद्यकीय उपचार, मानसोपचार व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषीला कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यात यावी, अशीही मुनगंटीवार यांनी मागणी केली.

Sudhir mungantiwar : पाणी प्रश्नावर मुनगंटीवारांची अभ्यासपूर्ण मांडणी; सभागृह जिंकले अन् सर्वपक्षीय सदस्यांची उत्स्फूर्त दाद

यासोबतच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, शाळा व परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे, बालसुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अधोरेखित केले. बालकांच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करत अशा अमानुष कृत्यांविरोधात कठोर भूमिका शासनाने स्वीकारावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली.

error: Content is protected !!