व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : धान उत्पादकांना हेक्टरी २० हजारांची प्रोत्साहनपर मदत द्या; विधानसभेत...

Sudhir Mungantiwar : धान उत्पादकांना हेक्टरी २० हजारांची प्रोत्साहनपर मदत द्या; विधानसभेत मुनगंटीवारांचा आग्रह

Sudhir Mungantiwar demands an incentive assistance of ₹20,000 per hectare for paddy farmers in the Maharashtra Legislative Assembly : पूर्व विदर्भासह कोकणातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सरकारला घातली भावनिक साद

Mumbai पूर्व विदर्भासह कोकणातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, त्यांच्या घामाचे मोल ओळखून मागील वर्षाप्रमाणे यंदाही प्रति हेक्टर २० हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील केली.

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा अत्यंत संवेदनशीलतेने मांडताना त्यांनी, “धानाचा बोनस हा शेतकऱ्यांचा हक्क असून त्यांच्या कष्टाचा सन्मान आहे. आपल्या ताटातील प्रत्येक भाताच्या घासामागे शेतकऱ्याचा घाम, संघर्ष आणि त्याग दडलेला आहे. त्या कष्टाचे मोल ओळखून शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” अशी भावनिक साद घालत तातडीने प्रोत्साहनपर मदत जाहीर करण्याची आग्रही मागणी केली.

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या धान उत्पादक जिल्ह्यांतील लाखो शेतकरी आजही शासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितले. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सभागृहात धान उत्पादकांना मदत देण्याबाबत व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेची आठवण करून दिली. मागील वर्षी शासनाने प्रति हेक्टर २० हजार रुपयांची मदत दिली होती. यावर्षीही त्याच धर्तीवर मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मुनगंटीवार यांनी आग्रही मागणी केली.

Rohit Pawar, Ravikant tupkar : पवार-तुपकर एका मंचावर; शेतकरी कर्जमाफीचाही एल्गार?

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचा संदर्भ देत शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करणारा निर्णय घेण्याचे आवाहन केले. “आपल्या प्रत्येक शुभकार्यात तांदळाच्या अक्षतांना मंगल मानले जाते, पण त्या अक्षता पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्यात मात्र निराशेची छाया असू नये. रोज आपल्या ताटात वाढला जाणारा प्रत्येक भाताचा घास हा शेतकऱ्याच्या घामाने, कष्टाने आणि संघर्षाने तयार झालेला असतो. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अपेक्षा आणि त्यांच्या कष्टाचे मोल ओळखून शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा,” असे भावनिक आवाहन त्यांनी सभागृहात केले.

चर्चेला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेला विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत शासन पूर्णपणे सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग निश्चित काढण्यात येईल. धान उत्पादकांना मदत लवकरात लवकर कशी देता येईल, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.

Charkha satyagrah : मुक्त व निष्पक्ष निवडणुकांसाठी मलकापुरात काँग्रेसचा ‘चरखा सत्याग्रह’

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदनांना विधानसभेत बुलंद आवाज देत त्यांच्या न्यायहक्कासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेली भूमिका सभागृहात विशेष लक्षवेधी ठरली. धान बोनस हा केवळ आर्थिक मदतीचा विषय नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा निर्णय असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. या चर्चेनंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय देणारा निर्णय शासन लवकरच घेईल, अशी आशा अधिक बळावली आहे.

error: Content is protected !!