व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashish Jaiswal : विरोधक हताश झाल्याने गँग बनवून समाजात असंतोष निर्माण करताहेत;...

Ashish Jaiswal : विरोधक हताश झाल्याने गँग बनवून समाजात असंतोष निर्माण करताहेत; आशिष जयस्वाल यांचा घणाघात

Opposition parties, frustrated by their setbacks, are forming gangs to create unrest in society, alleges Ashish Jaiswal : समाजात आक्रोशाचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप

Nagpur समाजात समस्या असणे स्वाभाविक आहे, परंतु विरोधक आता पूर्णपणे हताश झाले आहेत. त्यामुळेच काही वामपंथी आणि इतर संघटनांची गँग बनवून लोकांमध्ये जाणीवपूर्वक आक्रोश पैदा केला जात आहे. शासन व्यवस्थेच्या विरोधात समाज भडकवण्याचा हा प्रयत्न अत्यंत चुकीचा असून तो लोकशाही मार्गाने विरोध करण्याच्या भावनेला छेद देणारा आहे, अशी बोचरी प्रतिक्रिया राज्याचे वित्त राज्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते आशिष जयस्वाल यांनी दिली आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. समाजात अनेक ज्वलंत मुद्दे असतात आणि सरकार त्यावर नेहमीच सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असते, असे सांगत त्यांनी लोकशाही मार्गाने विरोध करणे वेगळे, पण समाजात आक्रोशाचे वातावरण निर्माण करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.

Chandrashekhar bawankule : सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता का?

या वेळी बोलताना त्यांनी विदर्भातील कृषी संकटावर आणि पावसाच्या टंचाईवरही भाष्य केले. गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे विदर्भातील पावसाचे संकट अद्याप कायम आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन पातळीवर उपाययोजना केल्या जात असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत योजना आखली जात आहे; तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही यावर सविस्तर चर्चा करून ठोस पावले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Malkapur APMC : ‘आठ महिन्यांचा फॉर्म्युला’ दीड वर्ष ओलांडला; सभापतीपदावरून कुजबूज

दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजपवर ओबीसींची उपेक्षा केल्याचा आणि पक्ष फोडल्याचा आरोप करत ‘ओबीसी जनता पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना जैस्वाल यांनी हाके यांना नवीन पक्षासाठी शुभेच्छा दिल्या, परंतु सोबतच टोलाही लगावला. लोकशाहीत प्रत्येकाला नवीन पक्ष स्थापन करण्याचा अधिकार असला, तरी केवळ एका व्यक्तीच्या भरवशावर समाज दीर्घकाळ पाठीशी उभा राहत नाही, असे ते म्हणाले. जनता नेहमी आपले हित आणि सरकारचे काम पाहूनच योग्य तो निर्णय घेते, असे सांगत त्यांनी हाके यांच्या आरोपांमधील हवा काढून घेतली.

error: Content is protected !!