व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NEET paper leak: NEET पेपर फुटीचा दिल्लीत भडका! विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार

NEET paper leak: NEET पेपर फुटीचा दिल्लीत भडका! विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार

Anil deshmukh urges president draupadi murmu to take strict action in NEET paper leak case : अनिल देशमुखांचे राष्ट्रपतींना थेट पत्र, कारवाईची केली मागणी

Nagpur नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशाची राजधानी दिल्लीत वातावरण प्रचंड तापले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेवर धडक देणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमुळे संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी वगळता सर्वच राजकीय पक्षांनी या आंदोलनात उडी घेतली असून, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी २१ जुलै रोजी थेट भारताच्या राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे कडक कारवाईची आक्रमक मागणी केली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत उपस्थित असलेल्या अनिल देशमुख यांनी घडलेला सर्व प्रकार स्वतः डोळ्यांसमोर पाहिल्याचे सांगत पोलिसांच्या बुरसटलेल्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींवर पोलिसांनी अत्यंत क्रूर व अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला, इतकेच नव्हे तर या धांदलीत मुलींचे कपडेसुद्धा फाडण्यात आले, असा अत्यंत गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.

Sunetra Pawar : ‘तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद होता…’आठवणींनी डोळे पाणावले”

या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष व उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, शांततापूर्ण आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांवर व प्रत्यक्ष बळप्रयोग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

Neet Paper leak : नीट पेपरफुटी प्रकरण तापलं; उद्धव ठाकरे जंतरमंतरवर

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवण्याचा मूलभूत अधिकार दिला असताना, काल घडलेला पोलीस लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आणि घटनात्मक अधिकारांवर केलेला थेट हल्ला आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती या देशाच्या सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असल्याने त्या पोलीस प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला वेसण घालून आंदोलकांना नक्कीच न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!