anti-paper leak bill to be introduced in Parliament today; provisions include up to 10 years’ imprisonment and a fine of up to ₹10 crore : पेपर फोडणाऱ्यांवर आणि पेपर विकत घेणाऱ्यांवरही कठोर कारवाईचीही तरतूद
New delhi दिल्लीतील नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरात उसळलेल्या तीव्र रोषाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आज सोमवारी लोकसभेच्या पटलावर ‘अँटी-पेपर लीक’ कडक कायद्याचे विधेयक मांडणार असून, त्यानंतर ते देशभर तात्काळ लागू केले जाणार आहे. या विधेयकात पेपर फोडणाऱ्यांवर आणि पेपर विकत घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या नवीन विधेयकानुसार, दोषींना १० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि १० कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास अवघ्या ६० दिवसांत पूर्ण केला जाईल आणि दोषी ठरलेल्यांना कोणत्याही परीक्षेसाठी ४ वर्षांची बंदी घातली जाईल.
Paper leak allegations : NEETनंतर MPSC भरतीही वादाच्या भोवऱ्यात
नीट पेपरवरून विद्यार्थ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन केले होते आणि देशभर मोठा असंतोष उफाळून आला होता. आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्यानंतर आंदोलन अधिकच चिघळले आणि सर्व विरोधक एकजूट झाले. या विषयावर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारला अखेर याची दखल घ्यावी लागली. सुरुवातीला फास्ट ट्रॅक कोर्ट जाहीर करण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने कडक कायदा जाहीर करण्यात आला, मात्र त्यानेही विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही. शेवटी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारला घ्यावा लागला असून, आता विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.








