व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar Bawankule : खबरदार सावजी मटणावर बोलाल तर….चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला मुंढे...

Chandrashekhar Bawankule : खबरदार सावजी मटणावर बोलाल तर….चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला मुंढे यांना सज्जड दम

Don’t Speak Against Savji Mutton: Chandrashekhar Bawankule Warns Mundhe : जगभर लोकप्रिय असलेल्या सावजी खाद्यसंस्कृतीबाबत बेजबाबदार वक्तव्ये टाळा; उद्योगविश्वाच्या पाठीशी सरकार

Nagpur -अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने विदर्भाच्या राजकारणात मोठा वाद निर्माण केला आहे. या विधानावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत, सावजी हा विदर्भाची शान असून, हजारो कुटुंबांच्या रोजगाराचा मुख्य आधार असलेल्या या उद्योगाला बळीचा बकरा बनवू नका, असे म्हणत मुंढेंवर कडक प्रहार केला आहे.

अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी, मी जर हे सावजी मटण खाल्ले, तर महिनाभर आजारी पडेन आणि हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, असे विधान केले होते. या वक्तव्यामुळे विदर्भातील सावजी हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

chandrashekhar-bawankule : माझी नार्को टेस्ट करा; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचे थेट आव्हान

या पार्श्वभूमीवर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विदर्भामध्ये गेली तीन ते चार पिढ्यांपासून सावजी रेस्टॉरंट्स अत्यंत प्रामाणिकपणे सुरू आहेत. सावजी ही मसाला आणि अन्नपदार्थ बनवण्याची एक आगळीवेगळी आणि पारंपरिक पद्धत आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सावजी जेवणाचा आस्वाद घ्यावासा वाटतो, इतकी या अन्नाची लोकप्रियता असून जगातल्या अनेक देशांमध्ये या पदार्थांना मोठी मागणी आहे.

Manoj jarange : ‘शिंदे साहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्हीच धोका दिलात’

अन्नात भेसळ किंवा आरोग्याला धोका असल्यास कायदेशीर कारवाई करण्यास कोणाचीही अडचण नाही, परंतु एका अधिकाऱ्याने संपूर्ण उद्योगावर सरसकट आणि नकारात्मक टिप्पणी करणे पूर्णपणे अयोग्य आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. हा केवळ एक रेस्टॉरंट व्यवसाय नसून हजारो कुटुंबांचा मोठा गृहउद्योग आहे. त्यामुळे हा व्यवसाय बंद पडेल किंवा या उद्योगाला फटका बसेल, अशी विधाने अधिकाऱ्यांनी टाळावीत, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान मुंढे यांनी मी सावजी खाऊ नका असे बोललो नसल्याचे स्पष्टीकरण देताना, अतिरिक्त तेल, मीठ, मसाले आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!