व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Tukaram Mundhe : ठाकरे, शिंदे की फडणवीस? कोण सर्वांत बेस्ट मुख्यमंत्री?

Tukaram Mundhe : ठाकरे, शिंदे की फडणवीस? कोण सर्वांत बेस्ट मुख्यमंत्री?

tukaram-mundhe-on-uddhav-thackeray-eknath-shinde-devendra-fadnavis-best-cm-question : तुकाराम मुंढेंचं मिश्किल उत्तर चर्चेत; म्हणाले…

Mumbai : आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे सातत्याने चर्चेत असलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत विचारलेल्या राजकीय प्रश्नाला दिलेल्या मिश्किल उत्तराची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तीन मुख्यमंत्र्यांपैकी कोणते मुख्यमंत्री तुम्हाला अधिक चांगले वाटतात, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील भेसळखोरीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या धडक कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. याच काळात विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात संबंधित मंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहितीही समोर आली होती.

या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांची एका मुलाखतीत प्रशासकीय कारकीर्द, कामाची पद्धत आणि त्यांना आलेल्या विविध अनुभवांवर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन माजी आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या तुलनेबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला.

Nana Patole : फडणवीसांच्या त्रासामुळेच शिंदेंची दिल्ली वारी, नाना पटोलेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोणते मुख्यमंत्री तुम्हाला अधिक चांगले वाटतात, असा प्रश्न तुकाराम मुंढे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाच्या निमित्ताने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील नियुक्त्यांचा संदर्भही देण्यात आला. या तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात मिळून आपल्याला सुमारे अडीच वर्षे कुठेही पोस्टिंग मिळाली नव्हती, असे त्यांना सांगण्यात आले.

यावर तुकाराम मुंढे यांनी कोणत्याही मुख्यमंत्र्याचे नाव न घेता अत्यंत मिश्किल उत्तर दिले. ‘मला तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटतो,’ असे म्हणत त्यांनी प्रश्नालाच वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी या मुद्द्यावर अधिक स्पष्टपणे भाष्य केले. आपल्याला खरोखरच एकूण अडीच वर्षे पोस्टिंग मिळाली होती की नव्हती, हे आपण कधी मोजले नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखतकाराने सांगितलेल्या माहितीमुळे आता हा कालावधी तपासावा लागेल, असेही ते म्हणाले. ‘कदाचित असेलही. मला आता माहिती नाही. कारण मी कधी असा कार्यकाळ मोजला नाही,’ असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

Dayashankar Tiwari : नोटीस मिळाली नाही, माफी मागणार नाही; दयाशंकर तिवारींचा अल्टिमेटम संपला, प्रफुल्ल गुडधे पुन्हा पेटले

आपल्या पहिल्या पोस्टिंगच्या काळातही आपण प्रतीक्षेत होतो, असा अनुभव त्यांनी सांगितला. मात्र, त्यावेळी आपल्याला प्रतीक्षेत का ठेवण्यात आले होते, याची माहिती आपल्यालाही नसल्याचे त्यांनी नमूद केले. पोस्टिंगसाठी अधिकाऱ्यांना दीर्घकाळ प्रतीक्षेत ठेवणे ही व्यवस्था आणि संबंधित अधिकारी, दोघांसाठीही योग्य बाब नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपल्या कारकिर्दीत कोणत्या सरकारच्या काळात किती काळ पोस्टिंग मिळाली किंवा मिळाली नाही, याचा हिशेब आपण कधी केला नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.

दरम्यान, याच मुलाखतीत तुकाराम मुंढे यांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी फार कमी अधिकारी सर्वसामान्यांसाठी आदर्श ठरतात. तुकाराम मुंढे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे लोकांनी तुम्हाला का फॉलो करावे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावरही तुकाराम मुंढे यांनी स्वतःला आदर्श मानण्याऐवजी प्रत्येकाने स्वतःच्या अंतर्मनाचा आणि क्षमतेचा शोध घ्यावा, असा संदेश दिला.

NCP Sharad pawar : शिंदेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही मोदींच्या भेटीच्या तयारीत; महाविकास आघाडीत खळबळ

‘मला कुणी फॉलो करावं असं मला वाटत नाही. लोकांनी कॉन्शन्सला फॉलो करावं,’ असे त्यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मतः काही ना काही क्षमता असते. ती ओळखणे आणि योग्य दिशेने विकसित करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माणूस जन्माला येताना चांगला किंवा वाईट असा ठरलेला नसतो. कुटुंब, शिक्षण, समाज आणि आजूबाजूचे वातावरण यामुळे त्याची जडणघडण होत जाते. या प्रक्रियेत व्यक्ती कोणत्या गोष्टी आत्मसात करते, यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

आपल्या मुलांनीही आपल्याला फॉलो करण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयाचा आणि द…

error: Content is protected !!