व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Rohit Pawar. : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण केव्हा?

Rohit Pawar. : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण केव्हा?

rohit-pawar-ncp-merger-ajit-pawar-bjp-mahayuti-condition : रोहित पवार यांनी सांगितली महत्त्वाची अट

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. अजित पवारांच्या पक्षाने भाजपची साथ सोडून महायुती सरकारमधून बाहेर पडल्यास दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण शक्य आहे, अशी रोखठोक अट रोहित पवार यांनी घातली आहे.

सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या रोहित पवारांनी विलिनीकरणाची शक्यता पूर्णपणे फेटाळली नसली, तरी भाजपविरोधातील आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. अजितदादांनी स्वतः विलिनीकरणाची तारीख ठरवून पुढाकार घेतल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. मात्र, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

Iran Us Conflict : होर्मुझमध्ये संघर्षाची धग; इराणचा १० जहाजांवर हल्ल्याचा दावा

दरम्यान, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार खासदार झाल्यानंतर या चर्चा काही काळ थंडावल्या होत्या. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबतच्या भेटी तसेच पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील प्रदीर्घ चर्चेमुळे विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपची साथ सोडण्याची अट ठेवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!