hotels, guest houses including Oyo hotels to keep CCtv footage record, government implements new rule : अनैतिक व्यवहारांना आणि बेकायदेशीर हालचालींना आळा घालण्यासाठी निर्णय
Nagpur नागपूर शहर आणि परिसरात ओयो तसेच विविध हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये चालणाऱ्या अनैतिक व्यवहारांना आणि बेकायदेशीर हालचालींना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि विशेष सूचनांनुसार नागपूर पोलीस आयुक्तालयाने ऑपरेशन शक्तीअंतर्गत ओयो हॉटेल्ससाठी कडक नियमावली जाहीर केली आहे.
या नव्या नियमांनुसार, ओयो आणि इतर हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ओळख पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी प्रवेशद्वारापासून ते लॉबीपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास सुरू ठेवून त्यांचे किमान ३ महिन्यांचे फुटेज सुरक्षित जतन करून ठेवणे हॉटेल चालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे लॉज आणि ओयो हॉटेल्समधील गैरकारभाराला चाप बसणार असून प्रशासनाचा वचक निर्माण होणार आहे.
Maratha reservation : मराठा आरक्षणाची धग वाढली: जरांगे आज मुंबईत धडकणार
मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रत्येक ओयो हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारावर झिरो टॉलरन्स’चा फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांची पूर्ण पत्ता आणि जन्मतारीख स्पष्ट असेलले कागदपत्रे तपासल्याशिवाय आणि त्यांची नोंद रजिस्टर किंवा डिजिटल प्रणालीमध्ये केल्याशिवाय खोली दिली जाणार नाही. १८ वर्षांवरील सज्ञान जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी असली तरी त्यांच्या वयाची व रहिवास पत्याची कडक तपासणी केली जाईल.
Fastag one tag : फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता करता येणार पोर्ट
तसेच अल्पवयीन मुला-मुलींना पालकांशिवाय कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. नियम धाब्यावर बसवून अनैतिक प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या हॉटेल मालक व व्यवस्थापकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या नियमावलीसोबतच ओयो ब्रँडचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या हॉटेल्सवरही नागपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. ओयो कंपनीच्या सहकार्याने पोलिसांनी आतापर्यंत २० हून अधिक अनाधिकृत हॉटेल्सवरील पाट्या हटवल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. बावनकुळे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’मुळे शहरातील ओयो हॉटेल्स आणि लॉजमधील बेकायदेशीर चालीरितींना मोठा आळा बसणार असल्याचे चित्र आहे.







