व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Suraj Pancholi : दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीचा मोठा खुलासा

Suraj Pancholi : दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीचा मोठा खुलासा

disha-salian-case-suraj-pancholi-statement-aditya-thackeray-connection : आदित्य ठाकरेंबाबतही केला महत्त्वाचा दावा, म्हणाले…

Mumbai : दिवंगत दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात विविध दावे आणि चर्चांना गेल्या काही वर्षांपासून उधाण आले आहे. आता अभिनेता सूरज पांचोलीने या प्रकरणात आपले नाव जोडले जात असल्याबाबत सोशल मीडियावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सूरज पांचोलीच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

सूरज पांचोलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिशा सालियान यांच्या मृत्यूशी संबंधित चर्चांमध्ये विनाकारण आपले नाव जोडले जात असल्याचे त्याने म्हटले आहे. सुरुवातीला प्रत्येक बातमी किंवा दाव्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नसल्याने आपण शांत राहिलो, असेही त्याने स्पष्ट केले. मात्र, वारंवार आपले नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याने आता काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करणे गरजेचे वाटल्याचे त्याने सांगितले. दिशा सालियान यांच्याशी आपला कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता आणि आपण त्यांना कधीही भेटलो नाही, असा दावा सूरज पांचोलीने केला आहे. इतकेच नाही तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनाही आपण कधी भेटलो नसल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; ५० जणांना आंदोलनाची परवानगी मागितली

आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना वारंवार नाव जोडले जाणे अत्यंत त्रासदायक असल्याचे सूरज पांचोलीने म्हटले आहे. तसेच आपला या प्रकरणाशी संबंध असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा दावाही त्याने केला आहे. सूरज पांचोलीने पुढे सांगितले की, यापूर्वी संबंधित चौकशी यंत्रणांसमोर त्याने आपले म्हणणे मांडले आहे. भविष्यात या प्रकरणाच्या तपासासाठी त्याची पुन्हा आवश्यकता भासल्यास तो चौकशी यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

Upi Transactions : यूपीआयच्या ₹२,००० पेक्षा मोठ्या व्यवहारांवर शुल्क लागणार!

दरम्यान, दिशा सालियान यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सविस्तर तपासाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सूरज पांचोलीने म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीचे नाव अशा संवेदनशील प्रकरणाशी जोडण्यापूर्वी संबंधित तथ्यांची योग्य पडताळणी करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे सूरज पांचोलीच्या या नव्या वक्तव्यामुळे दिशा सालियान प्रकरणातील चर्चांना पुन्हा वेग आला असून, त्याच्या दाव्यांवर आता पुढील तपासात काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

____

error: Content is protected !!