व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र कुराणासोबत गीता हाती घेणाऱ्या मुस्लिम कन्येचा संदेश : धर्माच्या पलीकडे माणुसकी; सुधीर...

कुराणासोबत गीता हाती घेणाऱ्या मुस्लिम कन्येचा संदेश : धर्माच्या पलीकडे माणुसकी; सुधीर मुनगंटीवारांचे मोलाचे सहकार्य!

फातिमा बहन यांच्या उर्दूतील भगवद्गीता अनुवादातून सामाजिक ऐक्याचा संदेश; ‘मन की बात’च्या १२ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात मांडले विचार

 

Chandrapur : एका मुस्लिम तरुणीच्या हातात एकाच वेळी पवित्र कुराण आणि श्रीमद्भगवद्गीता… हे केवळ एक दृश्य नसून भारताची विविधता, सांस्कृतिक समृद्धी आणि अखंडतेचे प्रतीक आहे. भगवद्गीतेचा उर्दू भाषेत प्रभावी अनुवाद करणाऱ्या फातिमा बहन यांनी आपल्या कार्यातून समाजाला धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचा सुंदर संदेश दिला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात फातिमा बहन बोलत होत्या.

फातिमा बहन म्हणाल्या, “गीता समजून घेताना मला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट उमजली. आपली भाषा, आपला धर्म आणि पूजेची पद्धत वेगळी असू शकते; परंतु प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा वस्तुपाठ जगातील प्रत्येक धर्मग्रंथ आपल्याला देतो.”

जरांगेंच्या ५०० कोटींच्या ‘ऑडिओ बॉम्ब’ने राजकारण तापले

 

भगवद्गीतेच्या उर्दू अनुवादाच्या या प्रवासात भाजपचे ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. “माझ्या हातात गीता देताना आणि या कार्यात मदत करताना सुधीर मुनगंटीवार यांनी ना माझा धर्म पाहिला, ना राज्य. त्यांनी केवळ माझ्या पाठीशी उभे राहून माझ्या कलागुणांना आणि चांगुलपणाला पाठबळ दिले,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले.

भाषणादरम्यान फातिमा बहन यांनी देशाच्या वाटचालीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही प्रकाश टाकला. भगवद्गीतेतील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या तत्त्वाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, कर्म करत राहणे आणि फळाची चिंता न करणे, हा जीवनाचा महत्त्वाचा संदेश आहे.

यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी संजय देशमुख आघाडीवर

 

“सेवा हेच खरे नेतृत्व आहे. पदावर अनेक जण बसतात; मात्र त्या पदाची जबाबदारी कर्तव्यभावनेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणे ही वेगळी गोष्ट आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगताना त्यांनी ‘उज्ज्वला योजना’, ‘आयुष्मान भारत’ आणि ‘जनधन योजना’ यांचा उल्लेख केला. या योजनांमागे केवळ राजकारण नसून ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक भारतीयाला सन्मान, रोजगाराच्या संधी आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, असा भारत घडवण्याचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी केला असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

डफरिन अग्निकांडाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह; अहवाल स्वीकारला नसेल, तर निलंबन कशाच्या आधारे?

ज्या व्यक्तीला ईश्वराचे आणि सत्याचे खरे ज्ञान प्राप्त होते, ती स्वतःचे तसेच इतरांचे जीवन बदलू शकते, असा ठाम विश्वास फातिमा बहन यांनी व्यक्त केला. एकीकडे धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात असताना, एका मुस्लिम तरुणीने उर्दू भाषेत भगवद्गीतेचा अनुवाद करून आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांनी तिला सहकार्य देऊन ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने बळ दिले आहे. ही घटना केवळ एक बातमी नसून, द्वेषाच्या वातावरणात माणुसकी आणि बंधुत्वाचा संदेश देणारा आशेचा किरण आहे, अशी भावना त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

____

 

error: Content is protected !!