व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal corporation : अकोला महापालिकेत भाजप-शिंदेसेनेत शिवीगाळ, एकमेकांवर धावून गेले!

Akola Municipal corporation : अकोला महापालिकेत भाजप-शिंदेसेनेत शिवीगाळ, एकमेकांवर धावून गेले!

Clash between leaders of BJP and Shivsena in the Akola Municipal Corporation premises : सभागृहातील वादाचे पडसाद, महापालिका आवारातच स्थायी समिती सभापतींना शिवसेना नगरसेवकांनी घेरले

Akola महापालिकेतील स्थायी समितीच्या बैठकीतील वाद संपत नाही तोच बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा महापालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेसेनेचे नगरसेवक सागर भारुका व मंगेश काळे यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाल्यानंतर प्रकरण थेट सिटी कोतवाली पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिका आवारात ‘निलंबनाचा अधिकार’ या मुद्द्यावरून तिघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक असलेला हा वाद काही क्षणांतच तीव्र झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संतप्त सागर भारुका यांनी विजय अग्रवाल यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेनंतर विजय अग्रवाल यांनी सागर भारुका आणि मंगेश काळे यांच्यावर चाकू हातात घेऊन प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर भाजपचे कार्यकर्ते आणि अग्रवाल समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमा झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Nagpur municipal corporation : काँग्रेसमध्ये ‘स्वीकृत’वरून ठिणगी; ४६ वर्षांची निष्ठा वाऱ्यावर, ज्येष्ठ नेते कमलेश समर्थांचा राजीनामा!

दुपारच्या सुमारास सागर भारुका आणि मंगेश काळे महापालिकेत आले होते. त्यांनी नगरसचिव अमोल डोईफोडे यांच्याकडून काही माहिती घेतल्यानंतर ते निघून गेले. नंतर सायंकाळी ते पुन्हा महापालिकेत परतले. आयुक्त अनुपस्थित असल्याने ते बाहेरच थांबले होते. काही वेळाने विजय अग्रवाल तेथे आले. त्यावेळी मंगेश काळे यांनी नगरसेवक निलंबनाच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला. यानंतर वाद वाढत गेला आणि भारुका यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

घटनेनंतर विजय अग्रवाल यांनी भाजप शहराध्यक्ष जयंत मसने, रणजित खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, विनोद मापारी आणि अन्य नगरसेवकांसह सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत त्यांनी भारुका आणि काळे मद्यधुंद अवस्थेत असून चाकू हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणानंतर महापालिका वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सागर भारुका यांच्या आक्रमक वर्तनामागे अन्य काही राजकीय सूत्रधार असल्याची चर्चा रंगली असून, पडद्यामागे तीन जण सक्रिय असल्याचा आरोपही केला जात आहे.

दरम्यान, नगरसेवक सागर भारुका यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांचे फलक हटवित असताना त्यांनी अधिकाऱ्यांना विरोध करत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची तक्रार अतिक्रमण अधिकारी प्रविण मिश्रा यांनी दिली. त्यावरून कोतवाली पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे.

Nashi kcrime news : नाशिकच्या ‘त्या’ कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर दबाव प्रकरणाने खळबळ!

विजय अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार सागर भारुका यांच्यासह तिघांविरुद्ध अश्लील शिवीगाळ, धमकी आणि हल्ल्याचा प्रयत्न याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महापालिका राजकारण पुन्हा तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!