व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Balwant Wankhede : ‘मी अर्ज दाखल केला, पण स्पर्धेत नाही’, खासदार वानखडेंचा...

Balwant Wankhede : ‘मी अर्ज दाखल केला, पण स्पर्धेत नाही’, खासदार वानखडेंचा दावा

Balwant Wankhede clarifies he is not in the race after applying for the post of Amravati District Congress President : जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा, २८ एप्रिलनंतर जिल्हा काँग्रेसला नवे नेतृत्व

Amravati अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने निवड प्रक्रियेला वेग आला आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरल्यानंतरही “मी स्पर्धेत नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या पदासाठी मावळते अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्यासह अनेक दावेदार मैदानात आहेत. दरम्यान, २८ एप्रिलनंतर जिल्ह्याला नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने संघटनबांधणीवर भर देत देशभरात ‘सृजन संघटन अभियान’ राबवले आहे. या अंतर्गत ग्रामीण व शहर अशा दोन्ही स्तरांवर नव्या अध्यक्षांची निवड केली जात आहे. यासाठी केंद्रीय निरीक्षक आफताब अहमद (हरियाणा आमदार) आणि राज्य निरीक्षक भाई जगताप (आमदार) यांनी अमरावतीत चार दिवस मुक्काम करत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

Paratwada sexual exploitation case : बदनामीमुळे पीडित तरुणी शांत होती, आता सगळच सांगितलं!

निरीक्षकांनी विश्रामगृहावर ‘वन टू वन’ तसेच सामूहिक बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार कोण, याबाबतचा अहवाल बंद लिफाफ्यात २३ किंवा २४ एप्रिलला पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर होईल. पक्षाच्या निर्देशानुसार, सर्वसाधारण, ओबीसी, एससी, एसटी, व्हीजे-एनटी, अल्पसंख्याक आणि महिला अशा सातही संवर्गांतील संभाव्य उमेदवारांची नावे अहवालात समाविष्ट केली जाणार आहेत.

Paratwada Sexual exploitation case : आपसांत भांडू नका, पुरावे असतील तर पोलिसांना द्या, बावनकुळे संतापले

दरम्यान, शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठीही मोठी चुरस निर्माण झाली असून, विद्यमान अध्यक्षांविरोधात वातावरण असल्याने तब्बल १४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर वानखडे म्हणाले, “मी अर्ज भरला असला तरी स्पर्धेत नाही. अनेक तालुका पदाधिकाऱ्यांनी बबलू देशमुख यांनाच पुन्हा संधी द्यावी, अशी भूमिका मांडली आहे. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.”

error: Content is protected !!