व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Buldhana Congress : काँग्रेसमध्येही ‘डबल जिल्हाध्यक्ष’ फॉर्म्युल्याची चर्चा; संतुलन साधण्याचा प्रयत्न

Buldhana Congress : काँग्रेसमध्येही ‘डबल जिल्हाध्यक्ष’ फॉर्म्युल्याची चर्चा; संतुलन साधण्याचा प्रयत्न

Congress may appoint two district presidents in Buldhana : घाटावर आणि घाटाखाली काँग्रेसची नवी रणनीती; जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

Buldhana जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षातही ‘दोन जिल्हाध्यक्ष’ फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी घाटावर आणि घाटाखाली अशा स्वतंत्र जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करून स्थानिक राजकीय संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयोगामुळे संघटनात्मक ताकद वाढण्याबरोबरच गटबाजीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे काँग्रेसमध्येही आता अशाच धर्तीवर संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून ‘एक जिल्हाध्यक्ष’ हीच पारंपरिक रचना कायम आहे; मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व नव्या पर्यायांवर विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Bacchu kadu : कर्जमाफीवर बच्चूभाऊंचा बदलला सूर, म्हणाले ‘सर्वांना कर्जमाफी नको’

दरम्यान, नव्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. काही इच्छुकांनी थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क वाढविल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील विविध गट, भौगोलिक संतुलन, जातीय समीकरणे आणि आगामी निवडणुकांतील राजकीय गणित लक्षात घेऊन काँग्रेस नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील घाटावरील आणि घाटाखालील भागांमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती असल्याने स्वतंत्र नेतृत्व दिल्यास कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळू शकते, असा दावा पक्षातील काही नेत्यांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे, दोन जिल्हाध्यक्ष नेमल्यास अंतर्गत स्पर्धा आणि समन्वयाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चर्चाही पक्षांतर्गत सुरू आहे.

Sunetra pawar : राष्ट्रवादीत राष्ट्रीय कार्यकारिणीवरून खळबळ; प्रफुल पटेल, तटकरे यांची नावं गायब !

एकूणच, काँग्रेस पक्ष आता पारंपरिक संघटनात्मक रचनेत बदल करून ‘डबल जिल्हाध्यक्ष’ फॉर्म्युला स्वीकारतो का, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत प्रदेश नेतृत्व कोणता निर्णय घेते, यावर काँग्रेसच्या जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय रणनीतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!