व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Buldhana Municipal council : लोकप्रतिनिधी अन् प्रशासनात समन्वय ठेवा; आमदारांच्या सूचना

Buldhana Municipal council : लोकप्रतिनिधी अन् प्रशासनात समन्वय ठेवा; आमदारांच्या सूचना

Development agenda takes centre stage at the Buldhana Municipal Council meeting; key resolutions approved : बुलढाणा पालिकेच्या सभेत विकासाचा अजेंडा, महत्त्वाच्या ठरावांना मंजुरी

Buldhana शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी केले. बुलढाणा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शनिवारी वारकरी भवन येथे नगराध्यक्ष पुजा संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गायकवाड प्रमुख्याने उपस्थित होते.

सभेत शहरातील नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते विकास, शिक्षण तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत सदस्यांनी अंमलबजावणीतील अडचणी, आवश्यक सुधारणा आणि प्राधान्यक्रमाबाबत सूचना मांडल्या.

Pravin pote patil : भाजपचे प्रवीण पोटे यांचा पहिल्याच फेरीत दणदणीत विजय; काँग्रेसला शून्य मतांचा धक्का

यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी नागरिकांना दर्जेदार आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. शहराच्या विकासासाठी मंजूर योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असून त्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

चर्चेनंतर विविध विकासकामे व नागरी सुविधांशी संबंधित अनेक विषयांवरील ठरावांना सभेची मंजुरी देण्यात आली. मंजूर ठरावांमुळे शहरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये वाढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सभेला नगर परिषदेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, मुख्याधिकारी गणेश पांडे, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, बांधकाम सभापती पुष्पाताई धूड, शिक्षण सभापती दीपक सोनुने, पाणीपुरवठा सभापती नयनप्रकाश शर्मा, महिला व बालकल्याण सभापती इंदुताई घट्टे, आरोग्य व स्वच्छता सभापती ईशरत परवीन मो. अझहर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विभागप्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Khamgao-Jalna railway : अधिसूचना आली, आता भूसंपादन आणि निधीसाठी खरी लढाई

नगर परिषदेच्या या सर्वसाधारण सभेत विकासाला केंद्रस्थानी ठेवत घेण्यात आलेले निर्णय आगामी काळात शहराच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!