व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar bawankule: बावनकुळेंशी पंगा घेत प्रा. राजकुमार घुले यांचा ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा...

Chandrashekhar bawankule: बावनकुळेंशी पंगा घेत प्रा. राजकुमार घुले यांचा ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्धार

Bjp ex- zp member to join Eknath shinde Shivsena: पालकमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपला भगदाड

Nagpur राज्याच्या राजकारणात एकीकडे भाजप इतर पक्षांतील बड्या नेत्यांना आपल्या गळाला लावत असताना, दुसरीकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात मात्र पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि लोककला मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले यांनी भाजपमधील अंतर्गत कुरघोडी आणि सातत्याने होणारी गळचेपी याला कंटाळून अखेर शिवसेनेचा (शिंदे गट) ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३ मे रोजी होणाऱ्या कलाभूषण पुरस्कार सोहळ्यात ते आपल्या शेकडो समर्थकांसह अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत.

प्रा. राजकुमार घुले हे गेल्या ३० वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. भारतीय जनता युवा मोर्चापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचला होता. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या वादामुळे गेल्या काही काळापासून घुले भाजपमध्ये असून नसल्यासारखेच होते. जरी ते सध्या कोणत्याही अधिकृत पदावर नसले तरी, कामठी विधानसभा मतदारसंघातील त्यांची सक्रियता पाहता, त्यांचा शिवसेना प्रवेश बावनकुळे यांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो.

Ashok kharat case : भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक, अधिक गंभीर खुलासे

राजकुमार घुले यांच्या राजकीय निष्ठेवर २०१२ च्या सुमारास प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते, जेव्हा त्यांचे मित्र आणि तत्कालीन जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून घुले यांनी भाजपपासून काहीसे अंतर राखून आपल्या कला संघाच्या बांधणीवर लक्ष केंद्रित केले. आज या संघाचे राज्यभरात तब्बल १७ लाख सक्रिय सदस्य आहेत. ही मोठी मतपेढी सोबत असल्याने शिंदे सेनेने नागपुरात आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी घुले यांना पक्षात घेण्याची खेळी खेळली आहे.

Ritesh Deshmukh : “शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान सहन करणार नाही”

विशेष म्हणजे, घुले यांना रोखण्यासाठी भाजपकडून त्यांना कलावंतांच्या कोट्यातून विधान परिषदेचे ‘गाजर’ दाखवण्यात आले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, भाजप नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडत थेट शिंदेंच्या शिवसेनेत जाणे पसंत केले. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यातून एक जुना निष्ठावान कार्यकर्ता बाहेर पडणे, हा भाजपसाठी मोठा इशारा मानला जात आहे.

error: Content is protected !!