व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘आवाकाडो’ची लागवड !

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘आवाकाडो’ची लागवड !

Deputy Chief Minister Eknath Shinde planted ‘avocado’ : स्थानिक शेतकऱ्यांनाही लागवड करण्यास देणार प्रोत्साहन

Satara – Dare : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतीप्रिय म्हणून ओळखले जातात. ठरावीक कालावधीनंतर ते त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी शेतात जात असतात आणि प्रत्येक वेळी नवनव्या झाडांची लागवड करतात. यावेळी त्यांनी आवाकाडो या परदेशी फळाची लागवड केली. यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू, बाबू आदी लागवड त्यांनी केलेली आहे.

आवाकाडो हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. एकनाथ शिंदे यांनी स्वतः हातात फावडे आणि झारी घेऊन ही लावगड केली. आवाकाडो फळाचा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही ही लागवड करण्यास ते प्रोत्साहन देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही त्यांनी या फळाचे महत्व समजावून सांगितले.

Devendra Fadanvis : जागतिक गुणवत्तेचे कृत्रिम अवयव आपल्या देशात !

सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यात कोयना नदीच्या पट्ट्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचे दरे हे गाव आहे. येथील जमीन सुपीक आहे. कोणतेही पीक घेतले तरी चांगले येते. त्यामुळे येथे केलेला आवाकाडो लागवडीचा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल, अशी खात्री शिंदे यांना आहे. स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी अशा बेरीवर्गीय झाडांची लागवड करणाऱ्या या पट्ट्यात आवाकाडो हे पीक शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न देणार ठरेल, असाही विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

Department of Co-Operation & Marketing : मुंबई-पुणे नव्हे, हिंगणघाटची बाजार समिती एक नंबर!

आपल्या शेतातील पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांना आवाकाडोचे पीक घेण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे प्रेरीत करणार आहेत. या लागवडीच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!