व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Khamgaon Politics : स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजपाची ४ नावे चर्चेत; ‘मुन्नाभाऊ’ चौथ्या जागेवर...

Khamgaon Politics : स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजपाची ४ नावे चर्चेत; ‘मुन्नाभाऊ’ चौथ्या जागेवर बाजी मारणार?

BJP’s Strategy for Co-opted Members : राम मिश्रा, ॲड. भट्टड, प्रमोद अग्रवाल यांची नावे निश्चित; चौथ्या जागेसाठी मतदानाची शक्यता

Khamgao नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीसाठी आता राजकीय हालचालींनी वेग घेतला असून भारतीय जनता पक्षाने चार नावांवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. संख्याबळाच्या जोरावर भाजपाच्या तीन जागा सुरक्षित असल्या तरी, चौथ्या जागेसाठी मात्र ‘मॅजिक नंबर’ जुळवताना भाजपाला राजकीय कसरत करावी लागणार आहे.

भाजपाच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षनिष्ठ आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. प्रदेश सचिव राम मिश्रा, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रमेश ऊर्फ बाबू भट्टड आणि उद्योजक प्रमोद अग्रवाल यांची नावे निश्चित मानली जात आहेत. मुन्नाभाऊ पुरवार यांचे नाव चौथ्या जागेसाठी चर्चेत आहे. मात्र, ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपाला अतिरिक्त मतांची बेगमी करावी लागणार आहे.

Administrative Action : तक्रारींची दखल न घेणे भोवले; विस्तार अधिकाऱ्यांना ‘शो-कॉज’ नोटीस!

खामगाव पालिकेत ३५ पैकी ३० सदस्य (२९ नगरसेवक + १ नगराध्यक्ष) भाजपाच्या पाठीशी आहेत. नियमानुसार ९ नगरसेवकांमागे १ स्वीकृत सदस्य नियुक्त होतो. १. पहिली ३ पदे: २७ सदस्यांच्या जोरावर भाजपाची तीन नावे सहजरित्या मंजूर होतील. त्यानंतर भाजपाकडे ३ मते शिल्लक राहतात. २. चौथी जागा: काँग्रेसकडे ३ आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडे ३ अशी मिळून ६ मते विरोधी गटात आहेत. भाजपाला मुन्नाभाऊ पुरवार यांना निवडून आणण्यासाठी या ६ पैकी मते फोडावी लागतील किंवा अपक्षांची मदत घ्यावी लागेल.

Local Body Elections : काँग्रेसकडे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी (अजित पवार)च्या दावणीला!

येत्या १३ जानेवारी रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या विशेष सभेत या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपा आपले संघटनात्मक कौशल्य वापरून चौथ्या जागेवरही आपलाच झेंडा फडकवणार की विरोधक एकजूट दाखवून भाजपाला रोखणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

error: Content is protected !!