व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ladki Bahin Scheme : ८० लाख लाभार्थींच्या केवायसी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

Ladki Bahin Scheme : ८० लाख लाभार्थींच्या केवायसी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

Demand for a high-level inquiry into the KYC issue involving 80 lakhs beneficiaries : लाडकी बहीण योजनेवरून जावेद जकरिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Akola राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या पडताळणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

जकरिया यांनी निवेदनात म्हटले आहे की, सुरुवातीला सुमारे २ कोटी ४६ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, केवायसी प्रक्रिया राबविल्यानंतर लाभार्थींची संख्या सुमारे १ कोटी ६६ लाखांवर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जवळपास ८० लाख महिलांच्या नोंदींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

ज्या महिलांच्या बँक खात्यांमध्ये योजनेची रक्कम जमा झाली, त्यांची केवायसी का झाली नाही, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तब्बल ८० लाख महिलांची केवायसी न होणे ही राज्यासाठी अत्यंत गंभीर बाब असून, यामागील वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Ladki bahin yojana : 80 लाख महिला अपात्र, 1500 रुपयांचा मासिक लाभ होणार बंद !

जकरिया यांनी लक्ष वेधले की, ८० लाख महिलांना दरमहा १,५०० रुपये लाभ दिल्यास शासनावर दरमहा सुमारे १,२०० कोटी रुपयांचा, तर वर्षाकाठी सुमारे १४,४०० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडतो. त्यामुळे सार्वजनिक निधीच्या वापराबाबत संपूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sting operation : खळबळजनक… केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या नियुक्तीचे आमिष दाखवत २० कोटींची मागणी!

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात सर्व लाभार्थींची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करावी, केवायसी न झालेल्या महिलांच्या नोंदींची विशेष तपासणी करावी, अपात्र अथवा बोगस लाभार्थी आढळल्यास त्यांच्याकडून रक्कम वसूल करावी तसेच गैरव्यवहारात सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून निष्पक्ष चौकशी करावी आणि वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षाही जावेद जकरिया यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!