व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nagpur congress conflicts : काँग्रेसचा ‘हात’ पुन्हा वादात! स्वीकृत सदस्यावरून ठाकरे-राऊत गट...

Nagpur congress conflicts : काँग्रेसचा ‘हात’ पुन्हा वादात! स्वीकृत सदस्यावरून ठाकरे-राऊत गट भिडले; प्रदेशाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्रावरून सस्पेन्स वाढला

The rift between Nitin Raut and Vikas Thakre factions has reached a boiling point : नागपूर महापालिकेतील २०१७ च्या गाजलेल्या वादाच्या इतिहासाची पुनरावृत्ती

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या nagpur municipal corporation राजकारणात सत्ता नसली तरी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष मात्र शिगेला पोहोचला आहे. स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून आमदार विकास ठाकरे आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे समर्थक पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असून, २०१७ च्या गाजलेल्या वादाच्या इतिहासाची पुनरावृत्ती या निमित्ताने झाली आहे.

२०१७ मध्ये राऊत-चतुर्वेदी गटाने विकास ठाकरेंना शह देत किशोर जिचकार यांची वर्णी लावली होती, मात्र यावेळी ठाकरे गटाने जोरदार पुनरागमन करत राऊत गटाला मात दिली आहे. संजय महाकाळकर यांनी गटनेते म्हणून केतन ठाकरे आणि अतुल कोटेजा यांची नावे स्वीकृत सदस्य म्हणून समोर केल्याने राऊत गटात अस्वस्थता पसरली आहे.

Nagpur municipal corporation : नागपूर महापालिकेत भाजपचे पुन्हा ‘महिला कार्ड’; ८ झोनमध्येही ‘मातृशक्तीला वंदन’

या सर्व वादाच्या केंद्रस्थानी आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ‘ते’ गुप्त पत्र आले आहे. नितीन राऊत यांनी दावा केला आहे की, आमदार ठाकरे आणि आपल्या गटाला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य देण्याचे आधीच ठरले होते. मात्र प्रत्यक्षात दोन्ही नावे ठाकरे गटाचीच समोर आल्याने राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

विशेष म्हणजे, प्रदेशाध्यक्षांनी नेमके कोणाच्या नावाचे शिफारस पत्र दिले, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या गोंधळात पक्षाचे माजी नेते कमलेश समर्थ यांनी उडी घेत प्रदेशाध्यक्षांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून या नियुक्त्यांना तुमची संमती आहे का? तुम्ही स्वतः कोणाची नावे सुचवली होती आणि निवडीसाठी निरीक्षक का पाठवले नाहीत? असा थेट सवाल समर्थ यांनी उपस्थित केला आहे.

Raj thackeray : ‘ही आगीशी खेळण्यासारखी परिस्थिती’ राज ठाकरे यांचा केंद्र सरकारला इशारा

काँग्रेसमधील या गटबाजीचा जुना इतिहास पाहता, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेची आठवण करून दिली जात आहे. त्यावेळी चव्हाणांनी मौन पाळले होते, मात्र आता हर्षवर्धन सपकाळ या वादावर काय खुलासा करतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजप ‘मातृशक्ती’च्या नावाने एकजूट दाखवत असताना, दुसरीकडे काँग्रेस मात्र अंतर्गत कुरघोडी आणि पत्रांच्या राजकारणात अडकल्याचे चित्र नागपुरात स्पष्टपणे दिसत आहे.

error: Content is protected !!