व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Akola Airport : शिवणी विमानतळाला ‘श्री संत गजानन महाराज’ नाव देण्याची मागणी;...

Akola Airport : शिवणी विमानतळाला ‘श्री संत गजानन महाराज’ नाव देण्याची मागणी; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

Demand to name Akola Shivani Airport after Shri Sant Gajanan Maharaj : अकोला विमानतळाच्या भूसंपादनासाठी सुमारे २०८ कोटी रुपयांचा निधी

Akola अकोला येथील शिवणी विमानतळाचे ‘श्री संत गजानन महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांनी केली असून, या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे आवश्यक शिफारस करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

राज्य शासनाने अकोला विमानतळाच्या भूसंपादनासाठी सुमारे २०८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, लवकरच हे विमानतळ लोकसेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Shivsena : नाराज नवलेंची काढली समजूत, राजीनामा नामंजूर!

 

शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला देशभरातून लाखो भाविक येतात. शेगाव नगरीला ‘विदर्भाची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो भाविक संतांच्या दर्शनासाठी येथे येतात. सध्या रेल्वे आणि रस्ते मार्ग उपलब्ध असले तरी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हवाई सेवा उपलब्ध नाही.

ही बाब लक्षात घेऊन आमदार सावरकर आणि खासदार धोत्रे यांनी अकोला येथील शिवणी विमानतळाचे विस्तारीकरण तातडीने पूर्ण करण्याबरोबरच त्याला ‘श्री संत गजानन महाराज विमानतळ’ असे नाव देण्याची मागणी केली होती. तसेच, या नामकरणास मंत्रिमंडळाची मान्यता देऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने राजकारणासाठी लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला; बावनकुळेंचा नागपुरातून हल्लाबोल!

 

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव (विमानचालन) यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच केंद्र शासनाकडे शिफारस पाठवली जाणार आहे. या निर्णयामुळे संत गजानन महाराजांच्या परंपरेला आणि विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!