Prime Minister Narendra Modis warning from the Red Fort : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
New Delhi : 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी देशाच्या एकतेचा गौरव करताना, शूर सैनिकांचा सन्मान केला आणि पाकिस्तानला तसेच जगाला ठाम संदेश दिला. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना सांगितले की, पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई देशाच्या संतापाची अभिव्यक्ती होती. सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते आणि त्यांनीच लक्ष्य निश्चित करून कारवाई केली. या कारवाईमुळे पाकिस्तानला प्रचंड फटका बसल्याची माहितीही त्यांनी दिली. “अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही,” असे ठणकावत त्यांनी शत्रूला इशारा दिला.
Ajit Pawar : अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही, तटकरेंना फिरू देणार नाही
मोदींनी सिंधू पाणीवाटप करारावरही कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, “हा करार अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. माझ्या देशाच्या नद्यांचे पाणी शत्रूच्या शेतांना सिंचन करत आहे, तर आपल्या शेतकऱ्यांची जमीन तहानलेली आहे. भारत आणि भारतीय शेतकऱ्यांचा या पाण्यावर एकहाती हक्क आहे. आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही.” तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा ध्यास मांडताना मोदींनी सांगितले की, वर्षाच्या अखेरीस “मेड इन इंडिया” सेमीकंडक्टर चिप्स बाजारात आणल्या जातील. सध्या देशात सहा उत्पादन युनिट्स उभारणीच्या टप्प्यात आहेत.
Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेला यश
स्वावलंबनाच्या महत्त्वावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, “जितके आपण इतरांवर अवलंबून राहतो, तितकी गुलामगिरीची भीती वाढते. रुपया किंवा डॉलर हे फक्त चलन नसून ताकदीचे प्रतीक आहेत. ताकद टिकवण्यासाठी स्वावलंबन आवश्यक आहे.”
लाल किल्ल्यावरील या भाषणातून पंतप्रधानांनी राष्ट्रीय अभिमान, शौर्य, आत्मनिर्भरता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे अधोरेखित करत देशवासीयांना एकजुटीचा संदेश दिला.
_____








