व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home प्रशासकीय Prataprao jadhav: कुंभमेळ्याला जाणारी गाडी शेगावला थांबवा

Prataprao jadhav: कुंभमेळ्याला जाणारी गाडी शेगावला थांबवा

Stop the Kumbh Mela special train at Shegaon : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

Khamgaon प्रयागराज येथील कुंभमेळाव्यासाठी सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडयांना शेगाव रेल्वे स्थानकावरही थांबा मिळावा अशी मागणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयाग राज येथे 13 जानेवारीपासून कुंभमेळाला सुरुवात झाली आहे. बारा वर्षानंतर येणाऱ्या या कुंभ मेळाव्यात देशभरातील भाविकांना सहभागी होता यावे यादृष्टीकोनातून केंद्र सरकारच्यावतीने विशेष रेल्वे गाड्याही सोडण्यात आल्या आहेत.

Pnakaja Munde : शेतीपूरक उद्योगांतून शोधा उत्पन्नाचे साधन!

यामध्ये हुजूर साहेब नांदेड पटना कुंभमेळा एक्सप्रेस, काचीगुडा पटना कुंभमेळा एक्सप्रेस आणि पटना सिकंदराबाद कुंभमेळा एक्सप्रेस या रेल्वे गाड्या माझ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जात आहेत. परंतु या गाड्यांना शेगाव येथे थांबा नाही . संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ शेगाव येथे आहे. संतनगरी शेगाव येथे देशभरातून लाखो भाविक येत असतात. भक्तांची मांदियाळी या ठिकाणी दररोज दिसून येते. कुंभमेळा विशेष रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा दिल्यास भक्तांना शेगाव येथील गजानन महाराजांच्या समाधीस्थळचे दर्शन घेण्याची संधी मिळेल. आणि बुलढाणा जिल्ह्यातील भक्तांनाही कुंभमेळा येथे जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल, असं जाधव यांनी म्हटलं आहे.

त्या दृष्टिकोनातून शेगाव रेल्वे स्टेशनवर उपरोक्त तिन्ही कुंभमेळा विशेष रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Anil Deshmukh : भाजपच्या सांगण्यावरूनच अक्षय शिंदेचा एन्काऊन्टर

शेगावात भाविकांची असते मांदियाळी

श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठ शेगावात देेशभरातील भाविकांची मांदियाळी असते. तसेच शेगाव परिसरातील भाविकांसाठी रेल्वे स्टेशन सोयीचे आहे़. शेगावला या विशेष गाड्यांना थांबा मिळाल्यास भाविकांना कुंभमेळ्यात सहभागी हाेता येणार आहे़. त्यामुळे, शेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची मागणी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वन वैष्णव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे़.

error: Content is protected !!