व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rahul Bondre : आंदोलनाने सुरुवात, आंदोलनाने निरोप… राहुल बोंद्रे भावुक!

Rahul Bondre : आंदोलनाने सुरुवात, आंदोलनाने निरोप… राहुल बोंद्रे भावुक!

Prakash patil avchar is new buldhana district prisident, rahul bondre’s tenure ends : जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात, प्रकाश पाटील अवचार नवे अध्यक्ष

Buldhana काँग्रेसच्या आंदोलनात्मक राजकारणाची झलक सोमवारी बुलढाण्यात पाहायला मिळाली. सरकारविरोधातील ‘आसूड मोर्चा’च्या पार्श्वभूमीवर मावळते जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांच्याकडे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा आंदोलनात्मक पद्धतीने सुपूर्द करण्यात आली. आसूड उगारत पदभार स्वीकारताना प्रकाश पाटील अवचार यांनी “गाव तिथे काँग्रेस शाखा” हा संकल्प जाहीर केला.

गर्दे हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “आसूड हा सरकारविरोधातील आमच्या आक्रोशाचे प्रतीक आहे. आम्ही गांधींच्या सत्याग्रहाचे आणि अहिंसेचे पुरस्कर्ते आहोत. मात्र सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आमच्या भूमीची भाषा आणि संस्कृतीचा वापर करावाच लागणार आहे,” असे ते म्हणाले. राज्य सरकारवर टीका करताना सपकाळ यांनी “महाराष्ट्रात पांडू हवालदार गृहविभाग चालवत आहे. बुलढाण्याचे पालकमंत्री दाखवा आणि हजार रुपये मिळवा,” अशी उपरोधिक टीकाही केली.

Legislative election : बाजोरियांची नाराजी दूर होईल, राणा दाम्पत्य साथ सोडणार नाही

यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आपल्या ११ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेत भावनिक भाष्य केले. “माझ्या जिल्हाध्यक्षपदाची सुरुवात आंदोलनातून झाली होती आणि आज समारोपही आंदोलनानेच होत आहे, याचा मला अभिमान आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे ‘भारत जोडो यात्रा’ ठरली. मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आणि एका मोठ्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला,” असे ते म्हणाले. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाचाही उल्लेख केला.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी पदभार स्वीकारताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. “हा संघर्षाचा काळ आहे. जिल्ह्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती मला माहिती आहे. सर्वांना सोबत घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचा कारभार पारदर्शक आणि प्रभावीपणे चालवू. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष अधिक तीव्र करू,” असे त्यांनी सांगितले.

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीत लवकरच संघटनात्मक पुनर्रचना; अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार

या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार राजेश एकडे, श्यामभाऊ उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, अरविंद कोलते, स्वातीताई वाकेकर, हरिभाऊ रावळ, मंगला पाटील, धनंजय देशमुख, हाजी जाहेदअली खान, अनंतराव वानखेडे, कासमभाऊ गवळी, देवानंद पवार यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!