व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar : मैत्रीचा हात, माणुसकीची साथ; मित्राच्या वेदनेत धावले मुनगंटीवार

Sudhir mungantiwar : मैत्रीचा हात, माणुसकीची साथ; मित्राच्या वेदनेत धावले मुनगंटीवार

MLA Sudhir Mungantiwar Rushed to Stand by His Friend in Pain : बालमैत्रीच्या नात्याला दिली माणुसकीची ऊब; संकटात मित्रासाठी ठरले मुनगंटीवार आधारवड

Nagpur आयुष्याच्या धावपळीत अनेक नाती काळाच्या ओघात मागे पडतात. मात्र काही नाती अशी असतात, जी वेळ, अंतर आणि परिस्थितीच्या पलीकडे जाऊन जपली जातात. संकटाच्या क्षणी तीच नाती आशेचा किरण ठरतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना श्रीकांत आंबटकर यांच्या जीवनात घडली आणि त्या प्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मैत्रीचे नाते किती संवेदनशील आणि जिव्हाळ्याचे असू शकते, याचा आदर्श समाजासमोर ठेवला.

गडीसुर्ला (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आणि सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेले श्रीकांत आंबटकर हे नागपूर येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांना तीव्र वेदना सुरू झाल्या. डोळे लाल होणे, मान वाकडी होणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू लागल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. नागपूरमधील नामांकित रुग्णालयात तपासण्या केल्यानंतर त्यांना ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले. त्यासाठी मोठी आणि जटिल शस्त्रक्रिया करावी लागेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Sudhir Mungatiwar: संकटकाळात धावून आले सुधीरभाऊ!  कर्जबाजारी शेतकऱ्याला विकावी लागली होती किडणी, मुनगंटीवारांमुळे मिळाली ५ लाखांची मदत 

मात्र पुढील वैद्यकीय सल्ल्यानंतर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात रेडिएशन (Gamma knife) उपचाराद्वारे शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रक्रियेमुळे कुटुंब चिंतेत होते. अशावेळी श्रीकांत आंबटकर यांना त्यांच्या जुबली हायस्कूलमधील १० वर्ष एकत्र शिकलेले बालमित्र, राज्याचे लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांची आठवण झाली.

श्रीकांत आंबटकर यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मित्राच्या वेदनेची गंभीरता लक्षात घेत आमदार मुनगंटीवार यांनी कोणतीही औपचारिकता न ठेवता तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी आपले स्वीय सहाय्यक सागर खडसे यांना तातडीने समन्वयासाठी सूचना केल्या आणि मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक हालचाली सुरू केल्या.

Sudhir Mungatiwar : राजकारणापलीकडचं नेतृत्व : प्रश्न जनतेचे, लढा मुनगंटीवारांचा

आंबटकर कुटुंब मुंबईत पोहोचण्यापूर्वीच आमदार मुनगंटीवार यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर श्रीकांत आंबटकर यांच्यावर उपचार प्रक्रिया सुरू झाली आणि अवघ्या तीन दिवसांत रेडिएशन उपचार पूर्ण झाले. शस्त्रक्रियेच्या मोठ्या मानसिक ताणातून आणि प्रशासकीय प्रक्रियेतील अडचणींपासून मुक्तता झाल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

या सर्व मदतीबद्दल श्रीकांत आंबटकर यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत मनापासून आभार मानले. राज्याच्या आणि मतदारसंघाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अत्यंत व्यस्त असतानाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या जुन्या मित्राची आठवण जपली, त्याच्या वेदनेला मनापासून समजून घेत संकटाच्या क्षणी आधाराचा हात दिला. त्यांनी जपलेले हे मैत्रीचे नाते आंबटकर कुटुंबासाठी केवळ मदत नव्हती, तर कठीण प्रसंगी मिळालेला भावनिक आधार आणि नव्या आशेचा किरण ठरला.

Dr. Pankaj Bhoyar on Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार हे राज्याला लाभलेले अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केला गौरव

मित्राच्या संकटात केवळ चौकशी करून थांबणारे अनेक असतात, पण मित्राच्या वेदनेला स्वतःची वेदना समजून धावून जाणारे फार थोडे असतात. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बालमैत्रीतील जिव्हाळा, संवेदनशीलता आणि माणुसकी जपत दाखवलेली ही कणव केवळ एका व्यक्तीला आधार देणारी नाही, तर समाजात मैत्रीचे नाते कसे जपावे, संकटात एकमेकांच्या पाठीशी कसे उभे राहावे आणि माणुसकीचा आदर्श कसा निर्माण करावा, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

error: Content is protected !!