BJP Party activists Pray at Kamakhya Temple in Guwahati for Sudhir Mungantiwar’s Continued Public Service : दीर्घ आयुष्यासाठी आसाम राज्यातील गुवाहाटी येथील कामाख्याचरणी कार्यकर्त्यांनी केली प्रार्थना
Chandrapur : संतांनी म्हटले आहे, “सेवा परमो धर्मः.” निःस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करणाऱ्याच्या पाठीशी ईश्वराची कृपा सदैव उभी असते. जनसेवेलाच जीवनाचे व्रत मानून अविरत कार्य करणारे महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ३० जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी देशातील ५१ शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ आसाम राज्यातील गुवाहाटी येथे निलाचल पर्वतावर स्थित असलेल्या जगतजननी माता कामाख्या देवीच्या पवित्र चरणी विधीवत पूजा-अर्चना करून त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड जनसेवेसाठी मनोभावे प्रार्थना केली.
आ. मुनगंटीवार यांना निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभावे. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, दिनदुबळे आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी विधानसभेत जनतेचे प्रश्न ते यापुढेही तितक्याच ताकदीने मांडत राहावेत आणि त्यांच्या जनसेवेचा दीप अधिक तेजाने समाजाचा मार्ग उजळत राहावा, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली.
या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आ. मुनगंटीवार यांच्या दीर्घायुष्यासाठी यज्ञ करून माता भगिनींना दक्षिणा व प्रसादाचे वितरण करून सेवाभावाचा संदेश दिला. भक्ती, श्रद्धा आणि आपल्या लाडक्या नेत्याविषयी असलेला आत्मीय जिव्हाळा या धार्मिक उपक्रमातून प्रकर्षाने दिसून आला.
राजकारणात अनेक नेते असतात; मात्र जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणारे आणि जनसेवेलाच ईश्वरसेवा मानणारे नेतृत्व विरळाच असते. सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता याच भावनेतून हा धार्मिक उपक्रम साकार झाला.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान
या कार्यक्रमात श्रीकांत आंबेकर, शशिकांत मुंडे, सुनील यादव, आकाश चौधरी, कमल वर्मा तसेच विनोद कोवेजी, रितेश गुप्ता, मनोज धामणकर, अनिल देशमुख, लालचंद कोल्हे, अरविंद सोनी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही पूजा केवळ वाढदिवसानिमित्त पार पडलेला धार्मिक विधी नव्हता; तर जनतेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या एका लोकनेत्याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि कृतज्ञतेची ती हृदयस्पर्शी अभिव्यक्ती होती.








