व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Washim MIDC : वाशिमला ‘औद्योगिक बुस्ट’! एमआयडीसीसाठी ४८.६७ कोटींचा निधी मंजूर

Washim MIDC : वाशिमला ‘औद्योगिक बुस्ट’! एमआयडीसीसाठी ४८.६७ कोटींचा निधी मंजूर

₹48.67 crore sanctioned for the development of infrastructure at Washim MIDC : रस्ते, पाणीपुरवठा, वीज व एमएसएमई पार्कच्या पायाभूत सुविधांना मिळणार चालना

Washim वाशिम जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी वाशिम एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४८ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच एमएसएमई पार्कच्या विकासाची कामे करण्यात येणार असून, त्यामुळे जिल्ह्यात उद्योग व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

वाशिम एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसीतील रस्ते विकासासाठी १८ कोटी, पाणीपुरवठ्यासाठी १६ कोटी, तर महावितरणच्या कामांसाठी ३ कोटी ८२ लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. याशिवाय एमएसएमई पार्कच्या विकासासाठी १० कोटी ८५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून उद्योजकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन नव्या उद्योगांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Manoj Jarange : ‘शिंदे-फडणविसांमुळेच माझ्यावर उपोषणाची वेळ’; मनोज जरांगेंचा नवा खुलासा

बैठकीत वाशिममध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याबाबतही चर्चा झाली. यासंदर्भातील आवश्यक बाबींची माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, उद्योजकांना विविध परवानग्या वेळेत मिळाव्यात, यासाठी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस अकोला येथे उपस्थित राहून परवानगीसंदर्भातील प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाशिमच्या औद्योगिक विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री भरणे यांनी उद्योगमंत्री सामंत यांचे आभार मानले. निधीमुळे एमआयडीसीतील पायाभूत सुविधा मजबूत होऊन उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Free school bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; स्कुल बॅग मिळणार मोफत !

बैठकीस खासदार संजय देशमुख, आमदार भावना गवळी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार श्याम खोडे, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, प्रादेशिक अधिकारी तसेच औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष अंगद राऊत, सचिव अतुल भोतकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!