व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water crisis : खामगावात ‘ड्राय रन’ कायम; पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापलं!

Water crisis : खामगावात ‘ड्राय रन’ कायम; पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापलं!

major water crisis in khamgao in mid summer : नळ कोरडे, आश्वासने ओले; नागरिकांचा संताप शिगेला

Khamgao शहरातील वाढत्या पाणीटंचाईने आता थेट राजकीय वळण घेतले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा रोष उफाळून येत आहे. राज्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले जात असताना, खामगावातील वास्तव मात्र पूर्णपणे वेगळे चित्र दाखवत आहे. येथे नागरिकांना पाणी बचतीचे धडे देण्याआधी, पाणी उपलब्ध करून देणे हीच मोठी गरज बनली आहे.

सध्याची परिस्थिती अशी आहे की, महिन्यातील चार आठवड्यांपैकी फक्त एकाच आठवड्यात नळातून पाणीपुरवठा होतो, तर उर्वरित काळ ‘तांत्रिक बिघाड’ हेच अधिकृत कारण पुढे केले जाते. परिणामी, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, पाण्यासाठी होणारी धावपळ दिवसेंदिवस वाढत आहे.

‘Shivaji kon hota?’ controversy : ‘वाचलं का पुस्तक?’ फडणवीसांचा टोला; वादाला नवं वळण

या पार्श्वभूमीवर शहरात उपरोधिक वातावरणही तयार झाले आहे. “पाणी वाचवा” हा संदेश नागरिकांनी अक्षरशः मनावर घेतला आहे, पण “आधी पाणी मिळाले तरच वाचवता येईल ना?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. काहीजण तर गंमतीने खामगावात ‘ड्राय डे’ची गरजच नसल्याचे म्हणत आहेत, कारण येथे तो आधीपासूनच कायम असल्याची टोलेबाजी ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, या गंभीर प्रश्नावरून स्थानिक राजकारणातही चांगलीच खळबळ उडाली आहे. एकीकडे जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाच्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे नागरिकांना टँकरच्या प्रतीक्षेत उभे राहावे लागत आहे, हीच खरी ‘ग्राउंड रिअॅलिटी’ असल्याचे स्पष्ट होत आहे.

पालकमंत्री मकरंद पाटील यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर आता जोर धरत आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले असून, प्रशासनाच्या अपयशावर बोट ठेवले जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून तांत्रिक अडचणींचे कारण देत परिस्थिती लवकर सुधारण्याचे आश्वासन दिले जात आहे.

Reservation Sub-classification : आरक्षण उपवर्गीकरणावर ‘भीम गर्जना’चा इशारा; आंदोलनाची ठिणगी!

पाणीटंचाईचा प्रश्न आता केवळ नागरी समस्या न राहता राजकीय मुद्दा बनला आहे. येत्या काळात प्रशासन यावर ठोस उपाययोजना करते की हा ‘ड्राय रन’ असाच सुरू राहतो, याकडे खामगावकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!