Vijay wadettiwar attacks NDA government on lathicharge in New delhi : आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर NEET पेपरफुटी प्रकरण पेटले
Nagpur NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली असून, या घटनेचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत, केंद्र सरकारने लाठीमार का केला, काय गरज होती? बळाचा वापर करून तरुण आणि विद्यार्थ्यांमधील असंतोष चिरडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण यामुळे युवकांमधील राग कमी होणार नाही, असा इशारा दिला.
Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा; उद्या प्राथमिक यादी जाहीर होणार
NEET पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. या आंदोलनाला ‘काँक्रेज जनता पार्टी’सह देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असून संसदेतही विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला तुटून पाडल्याने कामकाज बंद पडले. दरम्यान, उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरण व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केल्यामुळे आंदोलक आणखीच चिडले आहेत.
Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील ३५० आंदोलक ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
त्यातच आंदोलनादरम्यान ‘काँक्रेज जनता पार्टी’चे नेते दीपके यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून, या आंदोलनाला वेगळे वळण देऊन विषय भरकटवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या लाडीचार्जमध्ये नागपूरचा युवक भारत बानाईत हासुद्धा जखमी झाला आहे. यावर वडेट्टीवार यांनी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकाराला तरुणांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांचे आंदोलन चिरडून काढण्यात रस असल्याचा आरोप त्यांनी केला.








