Seven MPs left aam Aadmi party, likely to join BJP : विश्वासू नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का
New delhi : देशाच्या राजकारणातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला (आप) आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला असून पक्षाच्या १० पैकी तब्बल ७ खासदारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. या सातही खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. या महाफुटीमुळे ‘आप’चे राज्यसभेतील राजकीय अस्तित्व जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
या बंडाचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते. पक्षाचे तरुण चेहरा आणि खासदार राघव चढ्ढा यांना अलीकडेच राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले होते, तेव्हापासूनच त्यांची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ही बाब पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनाही खटकत होती. त्यामुळेच त्यांनी अशोक मित्तल यांची राज्यसभेतील गटनेते म्हणून नियुक्ती केली होती; मात्र आता खुद्द मित्तल यांनीच बंडखोरांच्या गटात सामील होऊन केजरीवाल यांना मोठा धक्का दिला आहे.
Akola Municipal corporation : कुलूप तोडून कार्यालयात घुसखोरी; विरोधी पक्षनेत्यासह पाच जणांवर गुन्हा
पक्षातून बाहेर पडणाऱ्यांमध्ये दिग्गज नावांचा समावेश आहे. यामध्ये संघटन कौशल्य असलेले संदीप पाठक, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, स्वाती मालिवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता या खासदारांचा समावेश आहे. या फुटीनंतर आता केजरीवाल यांच्याकडे केवळ संजय सिंग, संत बलबीरसिंग आणि एन.डी. गुप्ता हे तीनच खासदार शिल्लक राहिले आहेत. मद्यघोटाळ्याच्या आरोपातून नुकतीच निर्दोष मुक्तता झालेल्या केजरीवाल आणि संजय सिंग यांच्यासाठी हा काळ अत्यंत कसोटीचा ठरणार आहे.
New voters registration : नवीन मतदार नोंदणीत ‘तांत्रिक अडथळ्यांचा कट’?
विशेष म्हणजे, राघव चढ्ढा यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाची बाजू मांडणे पूर्णपणे थांबवले होते. संसदेत आणि सोशल मीडियावर आपल्या भाषणांनी तरुणाईला आकर्षित करणारे आणि मोबाईल कंपन्यांच्या २८ दिवसांच्या रिचार्जच्या प्रश्नावरून सर्वसामान्यांची दाद मिळवणारे चढ्ढा आता भाजपमध्ये कोणती भूमिका निभावणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








