व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Devendra fadnavis, nitin gadkari, sandip joshi : संदीप जोशींच्या निवृत्तीनंतर रिक्त जागेसाठी...

Devendra fadnavis, nitin gadkari, sandip joshi : संदीप जोशींच्या निवृत्तीनंतर रिक्त जागेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; ‘बड्या’ नावांची चर्चा, काहींना पुनर्वसनाची प्रतिक्षा!

Tug-of-war among senior leaders in BJP for the vacant Legislative Council seat : १३ महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात; गडकरी कुणासाठी आग्रही? फडणवीस कुणाला संधी देणार?

Nagpur मध्य नागपूर विधानसभा निवडणुकीत प्रवीण दटके यांचा विजय झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर नियुक्त झालेले आमदार संदीप जोशी यांचा १३ महिन्यांचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. जोशी यांनी आधीच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घोषित केल्यामुळे रिक्त होणाऱ्या या जागेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाची वर्णी लावतात, याकडे नागपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या ही जागा मिळवण्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली असून, उमेदवारांची मोठी यादी मुख्यमंत्र्यांच्या समोर आहे.

या जागेसाठी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे आणि मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश ठाकरे यांची नावे सध्या रेसमध्ये आघाडीवर आहेत. तिवारी यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. त्याचवेळी संदीप यांनीसुद्धा तयारी चालवली होती. मात्र शेवटच्याक्षणी दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पश्चिममध्ये पाठवण्यात आले होते. ते पराभूत झाले असले तरी त्यांना पदविधर निवडणुकीच्या कामाला लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उत्तर नागपुरातील चेहरा म्हणून विक्की कुकरेजा यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, या निवडीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

Girish mahajan : बुलढाणा भाजपच्या कलहात गिरीश महाजनांची एन्ट्री?

गडकरी यांनी नागपूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पोतदार यांना विधान परिषदेत पाठवावे, असे आवाहन पक्ष नेतृत्वाला केले आहे. दुसरीकडे, काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले उमरेडचे माजी आमदार राजू पारवे यांच्या पुनर्वसनाचा पेचही मुख्यमंत्र्यांसमोर आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पारवे यांना थांबवण्यात आले होते आणि त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे पारवे यांच्या नावाचाही या जागेसाठी गांभीर्याने विचार होऊ शकतो.

Nagpur Municipal corporation : गोरेवाडा पाण्यावरून काँग्रेस आक्रमक; आज महापालिकेचा ‘ऑन द स्पॉट’ दौरा.

अशा प्रकारे डझनभर इच्छुकांची नावे चर्चेत असली, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून ऐनवेळी दुसऱ्याच कोणाचे नाव समोर आल्यास या सर्व समीकरणांची उलथापालथ होऊ शकते. अशा स्थितीत प्रस्थापित दावेदारांचा नाईलाज होण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या अंतर्गत गोटात सध्या या जागेवरून मोठी खलबतं सुरू असून, येत्या ६ मे रोजी यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या एका जागेच्या निमित्ताने नागपूर भाजपमधील सत्तासमीकरणे आणि गटबाजीचे स्वरूप कसे बदलते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

error: Content is protected !!