व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Vidarbha Farmers : मुलभूत सुविधांसाठी शेतकरी आक्रमक, बाजार समितीत आंदोलन

Vidarbha Farmers : मुलभूत सुविधांसाठी शेतकरी आक्रमक, बाजार समितीत आंदोलन

 

Farmers protest at Malkapur apmc for basic facilities : प्रशासनाची नरमाईची भूमिका, ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे

Malkapur स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेलाड मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. काँग्रेस किसान ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे बाजार समिती प्रशासनाला अखेर नरमाईची भूमिका घ्यावी लागली. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर धरणे व ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

बेलाड येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मार्केट यार्डमध्ये शेतमालाच्या लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याची तक्रार अनेक दिवसांपासून होती. विशेषतः मालाची हर्रासी करताना ट्रॅक्टरमधून माल उतरविण्याची सक्ती, त्यासाठी हमाली व तोलाईचा वाढीव आर्थिक बोजा, व्यापाऱ्यांनी टिनशेड व्यापून ठेवल्याने शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी जागा न मिळणे, तसेच पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची अपुरी व्यवस्था या प्रमुख प्रश्नांवरून शेतकरी आक्रमक झाले.

PM Awas Yojna : घरकुलच्या दुसऱ्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक

आंदोलनकर्त्यांनी बाजार समितीकडे काही ठोस मागण्या मांडल्या. यामध्ये व्यापाऱ्यांचा टिनशेडमधील माल दोन दिवसांत हटवून संपूर्ण शेड शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे, अडत्यांच्या फळीवर माल नेण्यासाठी लागणारे ट्रॅक्टर भाडे खरेदीदारांकडून देण्यात यावे, तसेच यार्ड परिसरात पाणी व स्वच्छतागृहाची तातडीने व्यवस्था करावी, अशा मागण्यांचा समावेश होता. किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी देशमुख-शिर्के यांनी बाजार समिती प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करताना, “शेतकऱ्यांच्या अडीअडचणींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हा उद्रेक झाला आहे. आश्वासनांची पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला.

Akola Municipal corporation : अकोला महापालिकेत भाजप-शिंदेसेनेत शिवीगाळ, एकमेकांवर धावून गेले!

आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, तसेच बाळू ठाकरे, गोपाल सातव, सचिन शिंगोटे, हनुमान भगत, सुनील संबारे, अनंता चोपडे, आशिष मालठाणे, दिपक चोपडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.दिवसभर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर बाजार समिती प्रशासनाने लेखी आश्वासन देत मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे मान्य केले.

error: Content is protected !!