व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nazer Kazi : काझींना राज्यपाल नियुक्त आमदारकीची आशा; पालकमंत्र्यांच्या आश्वासनाने राष्ट्रवादीतील नाराजी...

Nazer Kazi : काझींना राज्यपाल नियुक्त आमदारकीची आशा; पालकमंत्र्यांच्या आश्वासनाने राष्ट्रवादीतील नाराजी शमली

Nazer Kazi eyes Governor-nominated MLA post; assurance from the Guardian Minister calms dissent within NCP : नाराजीवर पडदा! काझींच्या आमदारकीसाठी सकारात्मक संकेत, बंडाळी टळली

Sindkhedraja विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) कडून अॅड. नाझेर काझी यांना उमेदवारी न मिळाल्याने जिल्ह्यात पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली होती. मात्र, पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर ही नाराजी मोठ्या प्रमाणात निवळल्याचे चित्र आहे.

काझी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुलढाणा येथे पालकमंत्र्यांची भेट घेत सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला. या वेळी पालकमंत्र्यांनी संयम बाळगण्याचा सल्ला देत राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला.

Khamgao Politics : डिवरेंचे ‘चॅलेंज’ चर्चेत; खामगावात शिंदेसेनेचा दावा, महायुतीत खळबळ

याच भेटीत राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी अॅड. नाझेर काझी यांच्या नावाचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. या भूमिकेमुळे पक्षातील संभाव्य बंडाळी टळल्याचे मानले जात आहे.अॅड. काझी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष असून जिल्ह्यातील संघटन उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्यमान आमदार मनोज कायंदे यांच्या निवडणुकीत त्यांनी ‘किंगमेकर’ची भूमिका बजावल्याचेही मानले जाते. त्यामुळे त्यांना आमदारकीची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत होती.

Water crisis : नगराध्यक्षांना बैठकीत ऐन वेळेवर एन्ट्री, आता पाणीप्रश्न सुटणार की कायम राहणार?

दरम्यान, पक्षाने ऐनवेळी उमेदवारी न दिल्याने नाराजी वाढली होती. सोशल मीडियावरही पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत सामूहिक राजीनाम्याची भूमिका घेतली होती. मात्र, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता राज्यपाल नियुक्त आमदारपदाबाबत पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय काय घेतात, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!