व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rahuri by election : “राहुरीत कमळाची आघाडी भक्कम; विरोधक मोठ्या पिछाडीवर

Rahuri by election : “राहुरीत कमळाची आघाडी भक्कम; विरोधक मोठ्या पिछाडीवर

rahuri-byelection-2026-result-akshay-kardile-bjp-big-lead-third-round : अक्षय कर्डिले तिसऱ्या फेरीत १४ हजारांहून अधिक मतांनी पुढे

Rahuri : राज्यातील लक्ष वेधून घेतलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने दमदार सुरुवात करत निर्णायक आघाडी मिळवली आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी तब्बल १४ हजार ७११ मतांची मोठी आघाडी घेत विरोधकांना स्पष्टपणे मागे टाकले आहे. या आघाडीमुळे राहुरीत कमळ फुलण्याची चिन्हे अधिक ठळक होत असून राजकीय वातावरण तापले आहे.

लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय येथे सुरू असलेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीअखेर त्यांना ४ हजार ९८८ मते मिळाली, तर राष्ट्रवादी एसपीचे गोविंद मोकाटे यांना ७२२, वंचितचे संतोष चोळके यांना ३५६ आणि अपक्ष रावसाहेब खेवरे यांना १०९ मते मिळाली होती. यामुळे पहिल्याच फेरीत कर्डिले ४ हजार २६६ मतांनी पुढे होते.

Pocso crime rise : महाराष्ट्रात पोक्सोचा स्फोट, “दर ५३ मिनिटांनी चिमुकली असुरक्षित !

दुसऱ्या फेरीत ही आघाडी आणखी वाढली. दुसऱ्या फेरीअखेर अक्षय कर्डिले यांची मतसंख्या ११ हजार ७१ वर पोहोचली, तर गोविंद मोकाटे यांना १ हजार ४३४, संतोष चोळके यांना ८१२ आणि रावसाहेब खेवरे यांना ३७५ मते मिळाली. या टप्प्यावर कर्डिले ९ हजार ६३७ मतांनी आघाडीवर होते.

तिसऱ्या फेरीत कर्डिले यांनी आपली आघाडी आणखी मजबूत करत १६ हजार ८५२ मते मिळवली. त्याच वेळी गोविंद मोकाटे यांची मतसंख्या २ हजार १४१, संतोष चोळके यांची १ हजार २२ आणि रावसाहेब खेवरे यांची ७८४ इतकी झाली. या टप्प्यावर कर्डिले यांची आघाडी तब्बल १४ हजार ७११ मतांवर पोहोचली आहे. नोटालाही तिसऱ्या फेरीअखेर १६७ मते मिळाल्याची नोंद झाली आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच कर्डिले यांनी घेतलेली आघाडी पाहता भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आज अक्षय कर्डिले यांचा वाढदिवस असल्याने समर्थकांकडून ‘विजयी आमदार’ म्हणून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Nazer Kazi : काझींना राज्यपाल नियुक्त आमदारकीची आशा; पालकमंत्र्यांच्या आश्वासनाने राष्ट्रवादीतील नाराजी शमली

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाने काटेकोर नियोजन केले असून एकूण २० टेबलांवर २७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. मतदारसंघात ५६.२० टक्के मतदान झाले असून १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे. सकाळी साडेअकरा ते बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. कर्डिले यांची वाढती आघाडी पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी उर्वरित फेऱ्यांमध्ये गोविंद मोकाटे पिछाडी भरून काढू शकतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!